दर्शना पवार हत्या प्रकरणात मोठी माहिती; आरोपी राहुल हंडोरेची…
पुणे : लग्नाच्या कारणावरून वाद झाल्याने राहुल हंडोरे याने एमपीएससी परीक्षा पास झालेल्या दर्शना पवारची हत्या केली होती. १८ जून रोजी दर्शना पवारचा मृतदेह पोलिसांना राजगडाच्या पायथ्याशी आढळून आला होता.
दर्शनाचा मित्र राहुल यानेच तिची हत्या केल्याचं निष्पन्न होता पोलिसांनी त्याला अटक केली होती. दर्शना पवार हत्या प्रकरणात अटकेत असलेला आरोपी राहुल हंडोरे याची न्यायालयाने सोमवारी (ता .४) येरवडा कारागृहात रवानगी केली आहे.
पोलिस कोठडीची मुदत संपल्याने पोलिसांनी राहुल हंडोरे याला न्यायालयासमोर हजर केले होते. आता न्यायालयाने त्याची कारगृहात रवानगी केल्याची माहिती आहे.
दरम्यान, दर्शनाने विवाहास नकार दिल्याने तिच्या गळ्यावर कंपासमधील कटरने वार करून खून केल्याची कबुली हंडोरेने दिली होती. राहुल हंडोरे याने दर्शनाची हत्या केल्याचं उघड होताच राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात आला.
दरम्यान, न्यायालयाने हंडोरेला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. आता राहुल हंडोरे याच्या पोलीस कोठडीची मुदत सोमवारी संपली. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले.
न्यायालयाने हंडोरेला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. त्यानुसार हंडोरेची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली.