पुणे जिल्हा परिषदेच्या चार विषय समित्यांसाठी जिल्ह्यात मोठी फिल्डींग ! सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांच्याकडे इच्छुकांची लॉबिंग ..


उरुळी कांचन : दिवंगत अजित पवार यांच्या निधन पश्चात पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड प्रक्रियेत सर्वस्वीअधिकार आपल्याकडे ठेवलेल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व राज्यसभेचे खासदार पार्थ पवार यांच्या पुणे जिल्हा परिषदेच्या चार,विषय समित्यांच्या निवड प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले असून पुणे जिल्हा परिषदेच्या १५ इच्छुकांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. आता सभापतीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार म्हणून जिल्ह्याचे लक्ष या निवडीकडे लागले आहे.

पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम, पक्षु-संवर्धन , महिला बालकल्याण व समाजकल्याण सभापतींसाठी येत्या गुरुवारी (दि.२) रोजी निवड होणार आहे.हवेलीचे उपविभागीय अधिकारी डॉ.यशवंत माने यांच्या अध्यक्षतेखाली हा निवडणूक कार्यक्रम होणार आहे. अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची बिनविरोध निवड पाहता या विषय समित्यांवर निवड बिनविरोध अपेक्षित आहे. या सर्व विषय समित्यांवर मात्र राष्ट्रवादीचे१५ जिल्हा परिषद सदस्यांनी तीव्र,इच्छुकता दाखविल्याने या सदस्यांच्या मुंबईत देवगिरी निवास स्थानावर भेटीगाठीचे सत्र सुरू केले आहे. जिल्ह्यातील अडीच लोकसभा व दहा विधानसभा तसेच जातीय समिकरणांवर राष्ट्रवादीत या निवडी केल्या जाणार आहेत.

पुणे जिल्ह्यातील अध्यक्षपद बारामती तर उपाध्यक्ष शिरुर लोकसभेसाठी गेल्याने उर्वरीत विधानसभा मतदारसंघ निहाय या निवडी होण्याचे संकेत आहेत. विविध चार विषय समित्यांच्या सभापती पदांसाठी जिल्ह्यातील सहा तालुक्यांचे पारडे जड झाले आहे. यामध्ये मावळ, मुळशी, जुन्नर, खेड, हवेली आणि शिरूर या तालुक्यात हे पद जाणार असल्याचे निश्चित झाल्याने इच्छुकांची धावपळ सुरू आहे.

या विषय समित्यांसाठी शांताराम इंगवले, करण खलाटे, विष्णू हिंगे, विक्रम खुटवड, जितेंद्र बडेकर, मोनिका हरगुडे, छाया तांबे,ही प्रमुख नावे चर्चेत आहेत. पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष , उपाध्यक्ष तसेच चार विषय समित्या मिळून साधारण साडे चारशे कोटींचे वार्षिक नियोजन तसेच पुणे जिल्हा विकास आराखडा मिळून अंदाजे,चारशे कोटी असे भरभक्कम खर्चाचे नियोजन असल्याने पुणे,जिल्हा परिषदेसाठी इच्छुकांनी अजित पवार यांच्या पश्चात सुनेत्रा पवार व पार्थ पवार यांच्याकडे लॉबिंग सुरू केले आहे.

शिरूरमध्ये चार तालुक्यांत मोठी रस्सीखेच!

दरम्यान, शिरूर लोकसभा मतदारसंघात जिल्हा फक्त परिषदेची फक्त दोनच पदे दिली जाणार आहेत. यापैकी याआधी या लोकसभा मतदारसंघातील आंबेगाव तालुक्याला उपाध्यक्षपद देण्यात आलेले आहे. त्यामुळे आता या लोकसभा मतदारसंघात एकच सभापतीपद दिले जाणार आहे. या एका पदासाठी शिरूर, हवेली, खेड आणि जुन्नर या चार तालुक्यात मोठी रस्सीखेच होणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!