राजकारणात मोठा भूकंप; भाजपकडून ठाकरेंना मोठी ऑफर? युती होणार…

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्यानंतर उद्या निवडणुकांची मतमोजणी होणार आहे. त्यापूर्वीच राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता आहे. भाजपकडून शिवसेना ठाकरे गटाला मोठी ऑफर देण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, राज्यातील सत्ताधारी आणि सर्वात मोठे पक्ष असलेल्या भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी,आपला महापौर बसवण्यासाठी मित्र पक्षांच्या पाठिंब्यांची गरज लागत आहे, जिथे मित्र पक्षांच्या जागा कमी आहेत, तिथे इतरही पक्षांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे, आता चंद्रपूरमध्ये भाजपनं शिवसेना ठाकरे गटाला मोठी ऑफर दिली आहे.
चंद्रपूरमध्ये शिवसेना ठाकरे गटाला सव्वा वर्ष महापौरपद तसेच पाच पैकी दोन वर्ष स्थायी समितीचे अध्यक्षपद आणि उपमहापौरपदाची ऑफर भाजपकडून देण्यात आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार भाजपकडून शिवसेना ठाकरे गटाला सव्वा वर्ष महापौरपदाची ऑफर देण्यात आली आहे, मात्र पहिले सव्वा वर्ष कोणाचा महापौर होणार? यावर आता शिवसेना ठाकरे गटात चर्चा सुरू झाली आहे.

तर पहिले सव्वा वर्ष हा भाजपचा महापौर असेल अशी मागणी भाजपची आहे, जर शिवसेनेला हा फॉर्म्यूला मान्य नसेल तर मात्र भाजप विरोधी पक्षात बसणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.