राजकारणात मोठा भूकंप ; महापौरपदाच्या निवडीआधीच 15 नगरसेवक अज्ञातस्थळी, महापौर पदाचा तिढा सुटणार ?


पुणे : राज्यातील महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर मुंबईच्या महापौर पदाच्या निवडीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलं असताना महत्वाची माहिती समोर आली आहे.चंद्रपुरात महापौर पदासाठी काँग्रेसमधील अंतर्गत कुरघोडी सुरु आहेत. त्यानुसार विजय वडेट्टीवारांच्या गटाचे 15 नगरसेवक अज्ञातस्थळी रवाना झाला आहेत. त्यामुळे महापौर निवडीत मोठा ट्विस्ट आला आहे.

मुंबई महापालिकेमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.भाजपला 89 जागा मिळाल्या मात्र तरी देखील त्यांना महापौरपदासाठी स्पष्ट बहुमत मिळालं नसल्यानं त्यांना शिवसेना शिंदे गटाची मदत घ्यावी लागणार आहे. मात्र एकनाथ शिंदे यांनी आधीच आपल्या सर्व नगरसेवकांना हॉटेलमध्ये हलवलं आहे. त्यानंतर आता विजय वडेट्टीवारांच्या गटाचे 15 नगरसेवक अज्ञातस्थळी रवाना झाला आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

.तर दुसरीकडे प्रतिभा धानोरकरांकडून देखील 12 नगरसेवकांसाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे, येत्या दोन दिवसांत महापौर पदासाठी आरक्षण जाहीर होण्याची शक्यता आहे, त्यामुळे आता चंद्रपुरात महापौर कोण होणार? याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

राज्यात भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. अनेक ठिकाणी भाजपची शिवसेना शिंदे गटासोबत युती होती, 29 महापालिकांपैकी जवळपास 25 पेक्षा अधिक महापालिकांमध्ये भाजप आणि महायुतीची सत्ता आली आहे. दरम्यान महापालिका निवडणुकीमध्ये जनतेनं भाजप आणि महायुतीच्या बाजुने कल दिला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!