सोन्याच्या दरात मोठी घसरण! खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी, 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव जाणून घ्या…

पुणे : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतींमध्ये मोठ्या प्रमाणावर चढ उतार बघायला मिळत आहे. अलीकडे घसरण झाल्यामुळे खरेदीदारांची संख्या वाढली आहे. आशियाई बाजारपेठांमध्ये सोन्याचे दर कमी झाल्यामुळे, भारतात सोन्याच्या आयातीमध्ये वाढ झाली आहे. यामुळे दर बदलत असल्याचे दिसून येत आहे.
स्थानिक बाजारात किंमती कमी झाल्या आहेत. सोन्याच्या किंमतींमध्ये सतत बदल होत असल्यामुळे, खरेदी करण्यासाठी अनेक जणांनी घाई केली आहे. सध्या लग्न सराई असल्याने अनेकजण खरेदी करत आहेत. काही दिवसात दर वाढले असले तरी खरेदी देखील मोठ्या प्रमाणावर होत आहे.
सध्या पुण्यात 22 कॅरेट सोनं: 8,040 प्रति ग्रॅम, असून 24 कॅरेट सोनं: 8,771 प्रति ग्रॅम असे आहे. तुम्ही स्वतः सोन्याचे ताजे दर देखील सहजपणे शोधू शकता. यासाठी तुम्हाला फक्त एक मिस्ड कॉल करावा लागेल. तुम्ही 8955664433 वर मिस्ड कॉल देऊन 22 कॅरेट सोन्याचे आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेऊ शकता.
तुम्ही ब्लँक कॉल करताच, तुम्हाला सोन्याच्या दराबाबत माहिती असलेला एसएमएस येईल. दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात देखील सोने आणि चांदीच्या दरात तेजी पाहायला मिळाली होती. कॉमेक्सवर सोन्याचे दर 2872 डॉलर प्रति औस वर होते. कॉमेक्सवर 30.70 डॉलर्सची तेजी पाहायला मिळाली, त्यामुळं सोन्याचे दर 2879.20 वर पोहोचले होते.