तेव्हा मनात आत्महत्येचा विचार आला होता ! महादेव जानकरांचा मोठा खुलासा…!

पुणे : पुण्यातील एका कार्यक्रमात राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी मोठा खुलासा केला आहे. यामुळे उपस्थित विद्यार्थ्यांना एकच धक्का बसला. ते म्हणाले, “मला डॉक्टर व्हायचं होतं. बारावीच्या परीक्षेत मला ९१ टक्के पडले.
असे असताना त्यावेळी ‘एमबीबीएस’चं मेरीट ९१.३ टक्के लागलं होतं. त्यावेळी धनगर समाजाला आरक्षण नव्हतं. धनगर समाज खुल्या प्रवर्गात मोडत होता. प्वॉईंट तीन टक्क्यांनी माझा ‘एमबीबीएस’चा प्रवेश हुकला. यामुळे तेव्हा त्यांना खूप दुःख झाले.
त्यानंतर मनात आत्महत्येचा विचार आला होता. यावेळी मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची संख्या होती. विद्यार्थ्यांना पाहून जानकर यांना त्यांच्या विद्यार्थीदशेतील हा किस्सा आठवला. यावेळी त्यांनी अनेक गोष्टींना उजाळा दिला.
पुढे ते म्हणाले, आत्महत्या करायला जाताना मला शंतनुराव किर्लोस्कर यांचे आत्महत्या करणे हे भ्याडपणाचे लक्षण आहे, हे एक वाक्य आठवलं. त्यानंतर मी माघारी आलो. त्यानंतर जोमाने अभ्यास करून मेरीटमधूनच इंजिनिअरिंगला प्रवेश मिळविला.
यामुळे ते म्हणाले, कमी मार्क पडले म्हणून कुणी निराश होऊ नका. आत्महत्येसारखा विचारही मनात आणू नका, असेही ते म्हणाले.