दिल्लीत मोठ्या घडामोडी; धनखड यांच्या राजीनाम्यानंतर कोण होणार देशाचे नवे उपराष्ट्रपती? पहिले नाव समोर..

पुणे: जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यांनी प्रकृतीचं कारण दाखवत आपला राजीनामा सादर केला. धनखड यांच्या या निर्णयानंतर आता दिल्लीत उपराष्ट्रपती पदासाठी नव्या चेहऱ्याचा शोध घेतला जात आहे. असे असतानाच आता बिहार राज्यातीलच एका बड्या नेत्याची भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी.नड्डा यांनी भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल आहे.
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी राज्यसभेचे खासदार तथा केंद्रीय कृषीराज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांची भेट घेतली आहे. रामनाथ ठाकूर बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर यांचे पुत्र आहेत. नड्डा आणि ठाकूर यांच्या भेटीचा हा प्रसंग फारच विशेष मानला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार रामनाथ ठाकूर हे उपराष्ट्रपतीपदासाठीचे संभाव्य उमेदवार मानले जात आहेत.
कर्पुरी ठाकूर यांनी केलेल्या कामामुळे रामनाथ ठाकूर यांचे बिहार तसेच संपूर्ण देशात एक वेगळे वजन आहे. रामनाथ ठाकूर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जवळचे नेते असल्याचे मानले जाते. गेल्याच वर्षी केंद्र सरकारने रामनाथ ठाकूर यांचे वडील कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. आता उपराष्ट्रपती पदासाठी त्यांचं नाव चर्चेत आहे.