राज्य सरकारचा मोठा निर्णय, आता मंत्र्यांसाठी अँपलच्या आयपॅडची खरेदी, मंत्र्यांवर कोटींचा खर्च..

मुंबई : राज्य सरकारने ई-कॅबिनेट प्रणालीला गती देण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत मंत्रिमंडळातील सदस्यांसाठी अॅपल कंपनीचे आयपॅड, मॅजिक कीबोर्ड, अॅपल पेन्सिल आणि कव्हर्स यांची मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आली आहे.
या डिजिटल खरेदीसाठी सरकारने एकूण 1 कोटी 6 लाख 57 हजार 583 रुपयांचा खर्च मंजूर केला आहे. तसेच प्रति मॅजिक किबोर्डसाठी 31 हजार 188 रुपयांची तरदूत करण्यात आली आहे, 7 हजार 268 रुपये अॅपल पेन्सिलसाठी आणि 8 हजार 850 रुपये कव्हरची किंमत आहे.
हे सर्व साहित्य खरेदीसाठी सरकारकडून एकूण 1 कोटी 6 लाख 57 हजार 583 रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. सरकारकडून संबंधित कंपनीला 50 आयपॅड, 50 कीबोर्ड, 50 पेन्सिल आणि 50 कव्हरची ऑर्डर देण्यात आली आहे, तसेच हे सर्व साहित्य एका आठवड्याच्या आत देण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत.
राज्य सरकारने या वस्तू खरेदीच्या पार्श्वभूमीवर काढलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार ई -कॅबिनेटच्या पार्श्वभूमीवर आयपॅड आणि इतर साहित्य खरेदीची ई-निविदा 9 एप्रिल 2025 मध्ये काढण्यात आली होती. मात्र तांत्रिक निविदा छाननीमध्ये एकही निविदाकार पात्र न ठरल्यामुळे 15 दिवसांच्या कालावधीनंतर 13 मे 2025 रोजी पुन्हा एकदा निविदा काढण्यात आली.
दरम्यान, या संदर्भातील जाहिरात वर्तमान पत्रांमध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती. तसेच शासनाच्या संकेत स्थळावरही देण्यात आली होती. दिलेल्या जाहिरातीनुसार प्राप्त झालेल्या निविदांची तांत्रिक व व्यावसायिक छाननी केल्यानंतर रेडियस सिस्टीम या सेवा पुरवठादार कंपनीचा प्रस्ताव स्विकारण्यात आला आहे, या कंपनीला एका आठवड्याच्या आत सर्व साहित्य पुरवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सरकारकडून ई कॅबिनेटसाठी 50 आयपॅड, 50 कीबोर्ड, 50 पेन्सिल आणि 50 कव्हरची खरेदी करण्यात आली आहे. हे सर्व साहित्य एका आठवड्याच्या आत देण्याचे आदेश देखील संबंधित कंपनीला देण्यात आले आहेत. हे सर्व साहित्य खरेदीसाठी सरकारकडून एकूण 1 कोटी 6 लाख 57 हजार 583 रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. तसेच हे सर्व साहित्य वेळेत देण्याचे आदेश कंपनीला देण्यात आले आहेत. यासोबतच अनेक अटी देखील घालण्यात आल्या आहेत.