रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय ; ‘या’ काळात तब्बल १२,००० स्पेशल ट्रेन धावणार..


पुणे : रेल्वे प्रशासनाने दिवाळी आणि छट पूजेच्यावेळी प्रवाशासाठी मोठा निर्णय घेतला आहे.या काळात १२ हजार विशेष गाड्या चालवल्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

भारतीय रेल्वेने दिवाळी आणि छठ पूजा या सणांच्या निमित्ताने १२,००० विशेष ट्रेन चालवण्याची योजना आखली आहे. या विशेष गाड्यांमुळे प्रवाशांना सणासुदीला त्यांच्या घरी पोहोचण्यास मदतहोणार आहे. खास म्हणजे नियमित गाड्यांमध्ये तिकीट न मिळालेल्या प्रवाशांना अतिरिक्त बर्थची सोय करणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे.रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबतची माहिती दिली. येत्या दिवाळी आणि छठ सणांमध्ये प्रवाशांसाठी विशेष व्यवस्था केली जाईल, असे रेल्वेमंत्री यांनी म्हटलं आहे.

दरम्यान २०२४-२०२५ या काळात होळी, उन्हाळी सुट्ट्या यादरम्यान प्रवाशांसाठी १३,५०० विशेष गाड्या चालवण्यात आल्या होत्या. याशिवाय १ ऑक्टोबर २०२४ ते ३० नोव्हेंबर २०२४ या कालावधीत दिवाळीच्या निमित्ताने ७,९९० विशेष गाड्या चालवल्या गेल्या होत्या. तब्बल १.८ कोटी प्रवाशांनी रेल्वेने प्रवास केला होता. महाकुंभमेळ्यादरम्यानही भारतीय रेल्वेने १३ जानेवारी २०२५ ते २८ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत १७,३०० हून अधिक गाड्या चालवल्या होत्या. तेव्हा अंदाजे ४.२४ कोटी प्रवाशांना रेल्वेची सेवा मिळाली होती. त्यानंतर आता दिवाळी आणि छटपूजेसाठी 12000 ट्रेन धावणार आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!