एसटी महामंडळाचा मोठा निर्णय!! आता कर्मचाऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी, होणार फायदाच फायदा…

पुणे : एसटी महामंडळाने एक मोठा निर्णय घेतला आहे. महामंडळाने कर्मचाऱ्यांसाठी देण्यात येणाऱ्या फॅमिली पासचा कालावधी दोन सत्रांत प्रत्येकी एक महिन्याने वाढवला आहे. आता कर्मचाऱ्यांना पूर्वीपेक्षा दोन महिने जास्त फॅमिली पासचा लाभ घेता येणार आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. महामंडळाने कर्मचाऱ्यांसाठी देण्यात येणाऱ्या फॅमिली पासचा कालावधी वाढवला आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या कुटूंबाला याचा फायदा होणार आहे. आता एसटी कर्मचाऱ्यांना वर्षभरात चार महिने मोफत फॅमिली पास मिळणार आहे.
आता यामध्ये पहिले सत्र जानेवारी ते जून – 2 महिने मोफत प्रवास तसेच दुसरे सत्र जुलै ते डिसेंबर – 2 महिने मोफत प्रवास मिळणार आहे. दरम्यान, एसटी महामंडळात कार्यरत कर्मचाऱ्यांना एसटी प्रवासासाठी मोफत फॅमिली पास दिला जातो. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

याबाबत त्यांची अनेक दिवसांपासून ही मागणी होती ती अखेर पूर्ण करण्यात आली आहे. याबाबत महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी यासंबंधीचे परिपत्रक जारी करत सर्व विभाग नियंत्रकांना सूचना दिल्या आहेत. यामुळे येणाऱ्या काळात याबाबतचा लाभ मिळणार आहे.
दरम्यान, नुकताच एसटीचा प्रवास दर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी आहे. यामुळे सरकारने याबाबत देखील लक्ष घालून हे दर कमी करण्याची मागणी केली जात आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.