रेशन कार्डधारकांसाठी मोठा निर्णय; ‘या’ जिल्ह्यात तांदळाऐवजी आता मका दिला जाणार..


पुणे : राज्य शासनाच्या अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेअंतर्गत रेशनकार्डधारकांना धान्य वितरण केले जाते. आता या वितरण पद्धतीत मार्च महिन्यापासून बदल केला जाणार आहे.तांदळाऐवजी लाभार्थ्यांना गव्हासोबत मका दिला जाणार आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील लाखो रेशनकार्डधारकांच्या शिध्यात बदल होणार आहे.

रेशन कार्ड वरील लाभार्थ्यांना नियमितपणे गहू व तांदूळ वितरित केले जातात. मात्र मार्च महिन्यापासून या वितरण पद्धतीत महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. तांदळाऐवजी मका देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून अहिल्यानगर जिल्ह्यात आठ खरेदी केंद्रांवर मका खरेदी सुरू आहे. आतापर्यंत सुमारे 15 हजार क्विंटल मका खरेदी करण्यात आली आहे.

दरम्यान खरेदी केलेली संपूर्ण मका रेशन दुकानांमार्फत लाभार्थ्यांना वितरित केली जाणार असल्याने पुढील तीन महिने गव्हासोबत मका मिळण्याची शक्यता आहे.अंत्योदय योजनेतील कुटुंबांना दरमहा 10 किलो मका आणि 11 किलो गहू दिला जाणार आहे. तर प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना प्रत्येकी 2 किलो गहू आणि 1 किलो मका मिळणार आहे.

मक्याचे काय करायचे?असा प्रश्न काही कुटुंबांकडून उपस्थित केला जात आहे. मका दळून पीठ तयार करणे, भाकरी किंवा इतर पदार्थ बनवणे हे पर्याय असले तरी शहरी भागातील अनेकांना त्याचा वापर कसा करायचा याबाबत माहिती नसल्याचे दिसून येत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!