राज्य सरकारचा मोठा निर्णय! ईद-ए-मिलादच्या सुट्टीच्या तारखेत मोठा बदल, ‘या’ दिवशी मिळणार सुट्टी…


मुंबई : महाराष्ट्र सरकारने सुट्टीमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वी गोपाळकाला (दहीहंडी) आणि अनंत चतुर्दशी या सुट्ट्यांमध्ये बदल करण्यात आला. त्यानंतर आता ५ सप्टेंबरच्या ईद-ए-मिलाद निमित्त जाहीर सुट्टीत बदल करण्यात आला आहे.

याआधी ५ सप्टेंबर २०२५ रोजी जाहीर केलेली सार्वजनिक सुट्टी आता मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यात रद्द करण्यात आली असून, ती सोमवार, ८ सप्टेंबर रोजी असेल. ६ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी असून, राज्यभरात गणेश विसर्जन मिरवणुका मोठ्या प्रमाणात पार पडतात.

या पार्श्वभूमीवर हिंदू–मुस्लीम ऐक्य आणि सलोखा टिकवण्यासाठी मुस्लीम समाजातील प्रमुखांनी पुढाकार घेत, ईद-ए-मिलादची मिरवणूक ८ सप्टेंबरला घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळेच सरकारने परिपत्रक काढून ५ सप्टेंबरची सुट्टी रद्द करून ८ सप्टेंबरला सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.

कुठे लागू होणार नवा निर्णय?

मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्हा ८ सप्टेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी असेल.

इतर सर्व जिल्ह्यांमध्ये पूर्वीप्रमाणेच ५ सप्टेंबर रोजीच सार्वजनिक सुट्टी राहणार आहे.

दरम्यान, ५ सप्टेंबर रोजी मुंबईतील सर्व शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये आणि इतर सरकारी विभाग नियमित सुरू राहतील. सरकारने स्पष्ट केले आहे की, मुंबईकरांनी या बदलाची विशेष नोंद घ्यावी आणि संभ्रम टाळावा.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!