राज्यावर 17, 18, 19 आणि 20 मार्च रोजी मोठं संकट, 12 पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट…


पुणे : मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच सूर्याचे आग ओकने सुरू झाले असून दिवसाचा पारा झपाट्याने वर गेला आहे. ज्यामुळे विदर्भातील काही शहरांना उष्ण लाटेचा सामना करावा लागत आहे. मात्र उद्यापासून विदर्भात तापमानात बदल होऊन अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

17, 18, 19 आणि 20 मार्च रोजी मोठे संकट आहे. यादरम्यान राज्यातील काही भागांमध्ये प्रामुख्याने दुपारनंतर आभाळी हवामान तयार होऊन मेघगर्जनेसह पाऊस आणि वादळी वाऱ्यांची स्थिती निर्माण होण्याचा प्राथमिक अंदाज आहे.

सध्याच्या अंदाजानुसार ही स्थिती प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, खानदेश तसेच मध्य महाराष्ट्रातील भागांमध्ये दिसून येऊ शकते. यादरम्यान विजांचा कडकडाट, वादळी वारे, पाऊस आणि काही प्रमाणात गारपिटीची शक्यता देखील आहे. अंदाजानुसार 18 ते 20 मार्च दरम्यान हवामान घडामोडींची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांनी पुढील काही दिवस हवामानाच्या अद्ययावत अंदाजांकडे लक्ष ठेवावे व त्यानुसार शेतीची कामे नियोजित करावीत. सध्या रब्बी पिकांची काढणी सुरू असल्याने शेतकऱ्यांनी काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवण्याची व्यवस्था करावी. तसेच वादळी वारे, पाऊस आणि संभाव्य गारपीटीपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.

रब्बीच्या पिकाला काही दिवसांपूर्वीच पावसाने झोडपले, त्यानंतर आता कृषी विभागाकडून हा अत्यंत मोठा इशारा देण्यात आला. हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहे. काल अमरावती ठरले देशातील सर्वात उष्ण शहर. अरावतीमध्ये 42.2 सेल्सिअस अंश तापमानाची नोंद झाली. मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातील तापमानाच्या तुलनेत कालचे हे तापमान जास्त असल्याची माहिती.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!