लाडक्या बहिणींवर मोठं संकट? खात्यावर पैसे जमा होणार की नाही..; अधिवेशनातून महत्त्वाची माहिती


मुंबई: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पीय अधिवेशनातून महत्त्वाची माहिती समोर आली आहे.मंत्री गणेश नाईक लाडकी बहीण योजनेमुळे इतर खात्यावर अन्याय होत असल्याच वक्तव्य या अधिवेशनात केलं आहे.त्यामुळे आता या योजनेचं भवितव्य नेमकं काय असणार? ही योजना सुरूच राहणार का? महिलांना दर महिन्याला पैसे मिळणार का? असे प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतून महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात. सरकार सत्तेत आल्यानंतर 2100 रुपये देण्याचा आश्वासन लाडक्या बहिणींना दिलं होतं. मात्र 2100 रुपये कधीपासून मिळणार याची राज्यातील सर्व महिला वर्गाला प्रतिक्षा असतानाच आता या योजनेमुळे बाकीच्या खात्यावर अन्याय होत असल्याच वक्तव्य मंत्र्यांनी केल आहे.आहे. योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा भार पडला आहे. त्यामुळे ही योजना भविष्यात सुरुळीत सुरू राहणार का असा सवाल आता उपस्थित होत आहे.

काही दिवसांपूर्वी समाज कल्याण विभागाचा निधी या योजनेसाठी वळवण्यात आल्याची माहिती समोर आली होती.या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. नुकताच लाडक्या बहिणींच्या खात्यात जानेवारीचा निधी जमा करण्यात आला. मात्र या योजनेवर आता मोठा संकट आलं आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीच्या नेत्यांकडून आम्ही या योजनेतील लाभार्थी महिलांच्या सन्मान निधीमध्ये वाढ करू, त्यांना 2100 रुपये देऊ असा आश्वासन देण्यात आल होता.. मात्र राज्यात महायुतीचं सरकार सत्तेत येऊन आता एक वर्षांपेक्षा अधिक कालावधी झाला आहे, परंतु याबाबत कोणताही निर्णय सरकारने घेतलेला नाही. त्यामुळे लाडक्या बहिणी या प्रतीक्षेतच आहेत

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!