ठाकरे बंधूंच्या मुंबईतील सभेवर मोठ संकट ; वकील सदावर्ते कोर्टात जाणार, काय आहे कारण?


मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या युतीची चर्चा सर्वत्र असताना त्यांच्या उद्या होणाऱ्या मुंबईतील सभेवर मोठे संकट येणार आहे. सर्वाधिक चर्चेत असलेले वकील गुणरत्न सदावर्ते यांनी ठाकरेंच्या सभेला विरोध केला आहे. त्यामुळे आता नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्या 11 जानेवारी रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांची सभा अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. कारण, ठाकरे बंधू हे पहिल्यांदाच एकत्र येऊन सभा घेणार आहेत. या सभेमध्ये ठाकरे बंधू काय संदेश देणार आणि काय भूमिका मांडणार याकडे हे सर्वांचं लक्ष लागलं असताना वकील गुणरत्न सदावर्ते यांनी यावर आक्षेप घेतला आहे.

मुंबईतील छत्रपती शिवाजी पार्कवरील ठाकरे बंधूंच्या सभेला वकील गुणरत्न सदावर्ते यांनी विरोध केला आहे. त्यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. हायकोर्टाच्या जजमेंटचा हवाला दिला आहे. कुठल्याही राजकीय पक्षाला सभा घेता येत नाही असा सदावर्तेंचा दावा आहे. ठाकरे बंधूंना उद्या शिवाजी पार्क मैदानावर कायदेशीर दृष्ट्या उच्च न्यायालयाच्या निर्णयान्वये देता येत नाही असे त्यांनी म्हटले आहे.

सध्या राज्यात महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. येत्या 15 जानेवारीला 29 महापालिकांसाठी मतदान होणार आहे. तर 16 तारखेला या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. ठाकरे बंधू या निवडणुकीसाठी एकत्र रिंगणात उतरले आहेत. मात्र मुंबईतील सभेला वकील गुणरत्न सदावर्ते यांनी विरोध केला आहे. यावर आता ठाकरे बंधू काय प्रतिक्रिया देणार हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!