लक्ष द्या! पुण्यातील वाहतुकीत मोठे बदल, दोन दिवस ‘या’ मार्गांवर प्रवेश बंदी; जाणून घ्या पर्यायी रस्ते…


पुणे : भीमा-कोरेगाव येथील पेरणे फाटा येथे १ जानेवारीला ऐतिहासिक विजयस्तंभावर शौर्य दिन व अभिवादन सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी येत असतात. त्यामुळे या काळात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असते.

याच पार्श्वभूमीवर पुणे – नगर महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ३१ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजल्यापासून वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. हे बदल १ जानेवारी रात्री १२ वाजेपर्यंत असतील.

पुणे, मुंबई व सोलापूर मार्गांवरील वाहनांसाठी पर्यायी मार्ग…

       

पुण्याकडून नगरकडे जाणारी वाहने खराडी बाह्यवळण मार्गाने मुंढवा, मगरपट्टा चौक, पुणे–सोलापूर रस्ता, केडगाव चौफुला, न्हावरा व शिरूर मार्गे नगर रस्त्याकडे वळविण्यात आली आहेत.
पुणे–सोलापूर रस्त्याने आळंदी व चाकणकडे जाणारी वाहने हडपसर, मगरपट्टा चौक, खराडी बाह्यवळण मार्गाने विश्रांतवाडी मार्गे पुढे जाणार आहेत.

कोल्हापूर, सांगली आणि सातारा बाजूकडून कात्रजमार्गे येऊन मंतरवाडी फाटा व मगरपट्टा चौकमार्गे नगरकडे जाणाऱ्या वाहनांनी हडपसरमार्गे केडगाव चौफुला गाठून पुढे शिरूरच्या दिशेने प्रवास करावा.

इंद्रायणी नदीवरील आळंदी–तुळापूर पूल जड वाहनांसाठी तात्पुरता बंद ठेवण्यात आला असून, या पुलावरून केवळ हलक्या वाहनांना वाहतुकीची परवानगी देण्यात आली आहे. तसेच विश्रांतवाडी व लोहगावमार्गे वाघोलीकडे जाणारी जड वाहतूक पूर्णत: बंद राहणार आहे.

शहरात अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. लोणी काळभोर येथील थेऊर फाटा, खडकीतील हॅरिस पूल, विश्रांतवाडीतील बोपखेल फाटा, बाणेरमधील राधा चौक, सिंहगड रस्त्यावरील नवले पूल, कात्रज चौक, कोंढव्यातील खडी मशिन चौक, फुरसुंगी येथील मंतरवाडी फाटा आणि मरकळ पूल या मार्गांवरून शहरात येणाऱ्या सर्व जड वाहनांना बंदी आहे.

दरम्यान, लोणीकंद येथील आपले घर परिसर, बौद्ध वस्ती व तुळापूर फाटा (स्टफ कंपनीजवळ) येथे मोटारी व हलक्या चारचाकी वाहनांसाठी पार्किंगची सोय आहे. दुचाकी वाहनांसाठी आपले घर शेजारील वाहनतळ, मोनिका हॉटेलजवळ व रौनक स्वीटजवळ जागा उपलब्ध आहे.

बस व टेम्पोसाठी थेऊर रस्त्यावरील खंडोबाचा माळ, आपले घर सोसायटीजवळील मोकळी जागा, पेरणे गावातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळील मैदान तसेच ज्ञानमुद्रा व सोमवंशी अकॅडमी परिसरात वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!