आजपासून बँकिंग सिस्टिममध्ये मोठे बदल! ग्राहकांना दिलासा, जाणून घ्या संपूर्ण माहिती…


मुंबई : रिझर्व्ह बँकेने आजपासून बँकिंग सिस्टिममध्ये महत्त्वाचा बदल केला आहे. यामुळे ग्राहकांना मोठा फायदा होणार असून व्यवहारातील गती आणि पारदर्शकता वाढणार आहे. यामध्ये आता चेक क्लिअर होण्यासाठी दोन ते तीन दिवस लागत होते. मात्र आता ही प्रक्रिया त्याच दिवशी पूर्ण होणार आहे.

याबाबत माहिती अशी की, आरबीआयने ‘फास्ट चेक क्लिअरन्स सिस्टिम सुरु केली आहे. यामध्ये संध्याकाळी ४ वाजेपर्यंत जमा झालेले सर्व चेक त्वरित स्कॅन करून क्लिअरिंग हाऊसला पाठवले जातील. बँकांना हे चेक 7 पर्यंत कन्फर्म करणे बंधनकारक असेल.

सुरुवातीला दिल्ली, मुंबई आणि चेन्नई या क्लिअरिंग ग्रिडवर हे लागू होणार आहे. नंतर देशभरात होईल. मोठ्या रकमेच्या चेकसाठी Positive Pay System अनिवार्य केली आहे. यामध्ये बँकेला सगळी माहिती द्यावी लागेल. यामुळे चुकीचे चेक ऑटो-क्लिअर होणार नाहीत आणि फसवणूक होणार नाही. यामुळे ग्राहकांना चेकमधून पैसे त्याच दिवशी मिळतील.

दरम्यान, यामुळे व्यवहारातील अनिश्चितता कमी होऊन व्यवसायातील कॅश फ्लो अधिक सुरळीत होईल. बँकिंग प्रणाली अधिक कार्यक्षम, जलद आणि विश्वासार्ह होणार आहे. यामुळे अनेकांना याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!