पुणे भाजपात होणार मोठे बदल? कसब्यातील पराभवानंतर मोठा निर्णय…!

पुणे : कसबा पोट निवडणुकीत भाजपला पराभवाचा मोठा धक्का बसला. यामुळे सध्या पुण्यात भाजपात बदलाचे वारे वाहू लागले आहे. असे असताना आता मात्र कसब्यातील पराभवानंतर भाजपकडून नेतृत्वात बदल केला जाण्याची शक्यता आहे.
महिनाअखेरीस पुण्यातील भाजपा कार्यकारिणीत बदल होण्याचे संकेत आहेत. यामुळे आता काय काय बदल होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या पुणे शहर भाजपच्या कार्यकारिणीमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.
या महिनाअखेरपर्यंत बदलांची शक्यता आहे. पुण्याला नवीन शहराध्यक्ष मिळणार? की भाजप पुन्हा शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनाच संधी देणार हे पाहणं महत्वाचे असेल. यासाठी अनेकजण इच्छुक देखील आहेत.
पुणे शहर, जिल्हा कार्यकारिणीची दर तीन वर्षांनी नियुक्ती होते. मुदत संपली असल्याने या महिना अखेरीस बदल होण्याची शक्यता आहे. शहराध्यक्ष पदासाठी माजी महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार सिद्धार्थ शिरोळे, गणेश बीडकर, धीरज घाटे आणि माजी आमदार मेधा कुलकर्णी यांची नावं चर्चेत आहेत.