राज्यातील हवामानात मोठा बदल, वाढत असलेल्या तापमानात पुन्हा थंडी सक्रिय, 16, 17 आणि 18 जानेवारीला राज्यात…

पुणे : पुढील काही दिवस हवामानात चढउतार बघायला मिळेल, अशी माहिती सध्या समोर आली आहे. ऐन नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी राज्यातील अनेक भागात धुवाधार पाऊस झाला. यासोबतच गेल्या काही दिवसांपासून दुपारी ढगाळ वातावरण होत आहे. थंडी कमी जात होत आहे. यामुळे अनेकजण आजारी पडत आहेत.

यामुळे काळजी घ्यावी लागणार आहे.
सध्या आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. वायू प्रदूषणात प्रचंड वाढ झाली असून श्वास घेणेही मुंबईसारख्या शहरात खतरनाक बनले आहे. यामुळे ही एक चिंताजनक बाब आहे. मतदान करण्यासाठी अनेक लोक थेट मास्क घालून घराबाहेर काल पडल्याचे बघायला मिळाले.


मुंबईत सध्या प्रशासनाने मास्क घालून घराबाहेर पडण्याच्या सूचना दिल्या. सध्या उत्तरेकडे कडाक्याची थंडी पडली असून राज्यात देखील थंडीचा कडाका वाढू शकतो, असा अंदाज आहे. संक्रांत झाल्यावर थंडी कमी होईल असा अंदाज होता, मात्र थंडी कायम असल्याचे दिसून आले आहे. यामुळे काळजी घ्यावी लागणार आहे.
दरम्यान, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, झारखंड आणि ओडिशा या राज्यांमध्ये पुढील 3-4 दिवस थंडीची ही लाट कायम राहील. उत्तरेकडे थंडी वाढली तर राज्यातही थंडी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे काळजी घ्यावी लागणार आहे. राज्यात निफाडमध्ये सर्वात नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आली.
निफाडमध्ये 8.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. धुळ्यात 9.4 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. राज्यातील इतर भागात थंडी कमी झाली झाली आहे. मात्र अचानक दोन दिवस कमी झालेली थंडी वाढली आहे. यामुळे अजून काही दिवस गारवा जाणवणार आहे.
