आजपासून रेशनमध्ये मोठा बदल! कार्डधारकांसाठी नवीन नियम लागू, धान्य वितरणाच्या अटी काय?


पुणे : केंद्र सरकारकडून नववर्षापासून राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत रेशनमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. सरकारकडून लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या रास्त दर धान्याच्या मासिक वाटपात पुन्हा एकदा सुधारणा करण्यात आली आहे.

राज्यातील अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेंतर्गत दिल्या जाणाऱ्या तांदूळ व गहू यांच्या प्रमाणात बदल करत, आज १ जानेवारी २०२६ पासून नवे वितरण निकष लागू करण्यात येणार आहेत. या निर्णयाचा थेट परिणाम राज्यातील लाखो शिधापत्रिकाधारक कुटुंबांवर होणार असून, अन्न व नागरी पुरवठा विभागाने याबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.

नव्या आदेशानुसार, अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना दरमहा प्रती कार्ड २० किलो तांदूळ आणि १५ किलो गहू दिला जाणार आहे. तर प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेंतर्गत प्रत्येक सदस्याला दरमहा ३ किलो तांदूळ आणि २ किलो गहू मिळणार आहे. हे वितरण राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमातील मूळ तरतुदींनुसारच करण्यात येत असल्याचे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

       

रास्त दर दुकानांवर होणारे धान्य वितरण नव्या प्रमाणानुसार नियोजित करण्यात येणार असल्याने, लाभार्थ्यांनी आपल्या शिधापत्रिकेवरील सदस्यसंख्या, पात्रता आणि मिळणाऱ्या धान्याचे प्रमाण तपासून घेण्याचे आवाहन लाभार्थ्यांना करण्यात आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!