‘मार्च’च्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात मोठा बदल, जाणून घ्या बदललेले नवीन दर…


मुंबई : सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसांपासून वाढ होत असताना आज दर कमी झाले. आज सोन्याच्या किमतीत थोडीशी घसरण झाली आहे. सोन्याच्या किमती प्रति 100 ग्रॅम मागे 2,200 रुपयांनी कमी झाल्या आहेत. खरे तर गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमती सातत्याने वाढत आहेत. पण आज सोन्याच्या वाढत्या किमती कमी झाल्या आहेत.

यामुळे आज खरेदीसाठी अनेकांनी घाई केल्याचे दिसून आले आहे. आज चांदीच्या किमतीत कोणताच बदल झालेला नाही. आज एक मार्च 2025 रोजी एक किलो चांदीची किंमत 97 हजार रुपये इतकी नमूद करण्यात आली आहे. यामध्ये आज पुण्यात 22 कॅरेट सोन्याची किंमत 79 हजार 400 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 86 हजार 620 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 64 हजार 970 रुपये नमूद करण्यात आली आहे.

तसेच मुंबईमध्ये आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 79 हजार 400 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 86 हजार 620 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 64 हजार 970 रुपये नमूद करण्यात आली आहे. तसेच नागपूरमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 79 हजार 400 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 86 हजार 620 रुपये झाली आहे.

तसेच 18 कॅरेट सोन्याची किंमत 64 हजार 970 रुपये नमूद करण्यात आली आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून या दरांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. आता तर लग्न सराई सुरू असून अनेकजण खरेदीसाठी गर्दी करत आहेत. यामुळे सोनं लवकरच 1 लाख रुपयांकडे जाईल, असं सांगितलं जातं आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!