शेतकऱ्यांना मोफत विहीर योजनेत मोठा बदल!! आता ‘या’ शेतकऱ्यांना देखील मिळणार विहीर, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया…


पुणे : राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना शेतीसाठी विविध अनुदाने दिली जातात. यामध्ये ‘सिंचन विहीर योजना’ हा एक महत्त्वाची योजना आहे. आता या योजनेत मोठा बदल करण्यात आला आहे, ज्यामुळे जास्तीक जास्त शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या शेतकऱ्यांच्या हितासाठी मोठ्या प्रमाणावर निर्णय घेतले जात असून, या निर्णयांमुळे शेती आणि शेतकऱ्यांना प्रगतीचा नवा मार्ग मिळत आहे. असे असताना आता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत शेतकऱ्यांना विहीर बांधण्यासाठी चार ते पाच लाख रुपयांपर्यंतचे अनुदान दिले जाते.

याचा शेतकऱ्यांना फायदा होत आहे. या योजनेतून अल्पभूधारक शेतकऱ्यांना सिंचनासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. राज्यातील कोरडवाहू जमिनींना बागायतीमध्ये बदलण्यासाठी व पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी देखील योजना सुरू करण्यात आली आहे.

आता या योजनेत नुकताच एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. यामध्ये भोगवटादार वर्ग २ जमीनधारक शेतकऱ्यांनाही या योजनेत समाविष्ट केले आहे. यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे वर्ग २ प्रकारातील जमीन आहे, त्यांनाही विहिरीसाठी असणाऱ्या अनुदानाचा लाभ घेता येणार आहे. यामुळे असंख्य शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

यामध्ये सातबारा उतारा, जमीन धारकाचा दाखला, ओळखपत्र, पाणी स्रोताचा दाखला, तसेच भोगवटादार वर्ग २ असल्याचा पुरावा देखील तुम्हाला जमा करावा लागेल. या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी सरकारच्या अधिकृत पोर्टलवर देखील अर्ज सादर करता येईल. अर्जाची पडताळणी झाल्यावरच यासाठीचा लाभ मंजूर केला जाईल.

यामध्ये अनुसूचित जाती (SC) अनुसूचित जमाती (ST) इतर मागासवर्गीय (OBC) सामान्य प्रवर्गातील शेतकरी (OPEN) या शेतकऱ्यांना लाभ घेता येणार आहे. शेतकऱ्यांना थेट बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत. यामुळे पारदर्शकता देखील येणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!