बिग ब्रेकींग! अखेर हवेली मोजणी कार्यालयाचे उपअधीक्षक अमरसिंह पाटील निलंबित, हेलिकॉप्टर शॉटच्या कामाचं प्रकरण भोवलं….


उरुळीकांचन : हेलीकॉप्टर शॉट साठी माहिर असलेले हवेलीचे उपअधिक्षक अमरसिंह रामचंद्र पाटील यांना शासनाने निलंबित केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या उपसचिव आश्विनी यमगर यांनी आज हवेलीचे उपअधिक्षक अमर पाटील यांच्या निलंबनाचा आदेश जारी केला आहे. उपअधीक्षक अमर पाटील व भूकरमापक किरण येटाळे यांचेवर हडपसर येथील जमीन मोजणी प्रकरणात येरवडा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला आहे.

गुन्हा दाखल झाल्यापासून ते फरार झाले आहेत. हवेली मोजणी कार्यालयाबाबत उपसंचालक भूमि अभिलेख कार्यालय,जमाबंदी आयुक्त कार्यालय तसेच महसूलमंत्री यांच्याकडे नागरिकांनी तक्रारी केलेल्या होत्या. यामुळे हवेलीच्या मोजणी कार्यालयाची प्रतिमा मलीन झालेली आहे. त्यामुळे शासनाने अमर पाटील यांना पुढील आदेश होईपर्यंत शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.

निलंबन काळात पाटील यांचे मुख्यालय कार्यालय उपअधिक्षक कार्यालय लोहारा, जिल्हा धाराशिव असून त्यांनी धाराशिव जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांच्या पुर्व परवानगीशिवाय मुख्यालय सोडता कामा नये. असे निलंबन आदेशात स्पष्ट नमूद आहे.

अमर पाटील यांना हडपसर येथील मोजणी प्रकरण भोवलं..

हडपसर येथील सर्वे नं. 181/3, 181/4अ, 181/6 व 181/9/1 या मिळकतीची सन 2023 व सन 2024 मध्ये भुमीअभिलेख कार्यालय, हवेली, पुणे यांच्याकडून शासकीय फी अदा करुन कायदेशीर रितसर पद्धतीने मोजणी तक्रारदाराने करुन घेतली होती. मात्र सदर जागेच्या मोजणीनंतर हद्द निश्चिती करण्यासाठी व तसा मोजणी नकाशा देण्यासाठी ‘हेलिकॉप्टर शॉट लाच’ मागणी व चुकीच्या मोजणीचे ‘क’ प्रत प्रकरण उपअधीक्षक पाटील यांच्यावर चांगलेच शेकले असून गुन्हा दाखल झाल्याने त्यांना शासनाने निलंबित केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!