मोठी बातमी! अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अटक, पॉर्न स्टारशी संबंध असल्याचा आरोप….!
न्यूयार्क : अमेरिकेतून सध्या एक मोठी बातमी समोर आली आहे. यामुळे जगभरात एकच खळबळ उडाली आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पोलीसांनी अटक केली आहे. न्यूयॉर्क ग्रँड ज्युरीने ट्रम्प यांच्यावर अॅडल्ट स्टार प्रकरणात फौजदारी खटला चालवण्यास मान्यता दिली आहे.
या प्रकरणामुळे आता त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ट्रम्प हे अमेरिकेच्या इतिहासातील पहिले माजी राष्ट्राध्यक्ष बनणार आहेत ज्यांच्यावर फौजदारी खटला दाखल करण्यात आला आहे. यामुळे याची चर्चा सुरू आहे.
सर्वात गंभीर आरोप म्हणजे पॉर्न अभिनेत्री स्टॉर्मी डॅनियल्सला पैसे देण्याचा आरोप आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचे पॉर्न स्टार असलेल्या स्टॉर्मी डॅनियल्ससोबत अफेअर असल्याचा आरोप आहे. ही माहिती लपवण्यासाठी त्यांनी 2016 मध्ये डॅनियल्सला 1,30,000 डॉलर दिल्याचा आरोप आहे.
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. अशा प्रकारे गुन्हेगारी आरोपांना सामोरे जावे लागलेले ट्रम्प हे अमेरिकेच्या इतिहासातील पहिले राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फसवणुकीच्या 30 पेक्षा जास्त गुन्ह्यांचा आरोप आहे.