Breaking News : सत्तासंघर्ष प्रकरणात शिंदे गटाला मोठा धक्का..


नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून शिंदे सरकारच्या 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय कधी येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत आता मोठी बातमी समोर आली असून आता राज्याचे सत्तासंघर्ष प्रकरण आता 7 न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे देण्यात येणार आहे.

 

यावर आज मोठा निकाल आला आहे. यामध्ये व्हीप फक्त राजकीय पक्ष देऊ शकतात. असेही सरन्यायाधीशांनी म्हटले आहे. अध्यक्षांनी या प्रकरणाची चौकशी करायला हवी होती, भरत गोगावले यांची नियुक्ती बेकायदेशीर असल्याचे देखील म्हटले आहे. यामुळे शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे.

 

एकनाथ शिंदे गटाच्या 16 आमदारांना अपात्र ठरविण्याचा निर्णय विधानसभेचे तत्कालीन अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी दिला होता. त्यावर शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने सर्वौच्च न्यायालयात दाद मागितली होती.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!