साताऱ्यात शरद पवारांना मोठा धक्का; जिल्हाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा अन अजित पवारांच्या राष्ट्रवादीत एन्ट्री ?


सातारा : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना साताऱ्यात राजकीय भूकंप आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. राजीनाम्यानंतर माने यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,, जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला जय महाराष्ट्र केला आहे. माने यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. माने यांनी नुकतंच प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याकडे जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा सोपवला. लवकरच ते अजित पवार गटात पक्षप्रवेश करतील.गेल्या काही दिवसांपासून माने यांच्या राजीनाम्याबाबत चर्चा होती. या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत उद्या रहिमतपूर येथे हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. कार्यकर्त्यांसह हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार असल्याची माहिती आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे. अजित पवार गटात इनकमिंग सुरु असल्यामुळे पक्षाची ताकद वाढली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!