ऐन निवडणुकीत राज ठाकरेंना मोठा धक्का, शहराध्यक्षांचा मनसेला जय महाराष्ट्र


मुंबई:राज्यातील २९ महापालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे.या महापालिका निवडणुकीच्या तोंडावरचं आता कल्याण डोंबिवलीत मनसेला मोठा धक्का बसला आहे. शहर अध्यक्ष कौस्तुभ देसाई आणि माजी नगरसेविका कस्तुरी देसाई यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून कल्याण आणि डोंबिवलीमध्ये राजकीय घडमोडी अन् फोडाफोडी मोठ्या प्रमाणात झाली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेनंतर आता राज ठाकरेंच्या मनसेलाही कल्याणमध्ये जोरदार धक्का बसला आहे. राजू पाटील यांचे विश्वासू कौस्तुभ देसाई आणि त्यांच्या पत्नी कस्तुरी देसाई यांनी मनसेला जय महाराष्ट्र केला आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा मनसेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

मनसेचे कल्याण शहर अध्यक्ष कौस्तुभ देसाई आणि त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका कस्तुरी देसाई यांनी मनसेचा आज राजीनामा दिला. माजी आमदार राजू पाटील यांचे समर्थक मनसे शरह अध्यक्ष कौस्तुभ देसाई,मनसेच्या माजी नगेसेविका कस्तुरी देसाई यांनी आज पक्षाला अखेरचा जय महाराष्ट्र केला. दोन दिवसांत ते पुढील रणनिती ठरणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर आता ते कोणत्या पक्षात प्रवेश करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान कौस्तुभ देसाई यांचं कल्याणमध्ये मोठं प्रस्थ आहे. त्यांचा मतदारांसोबत थेट संपर्क असल्याने मनसेच्या वाढीसाठी फायदा होत होता. विधानसभेत राजू पाटील यांच्या प्रचारात त्यांनी मोलाचे योगदान दिले होते. राजू पाटील यांचे विश्वासू म्हणून देसाई यांची ओळख होती. पण त्यांनी मनसेला आता जय महाराष्ट्र केला आहे. देसाई यांनी रामराम ठोकल्याचा फटका मनसेला बसणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!