मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू मानल्या जाणाऱ्या दांम्पत्याचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश


मुंबई : राज्यात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असताना मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. अनेक पक्षांमध्ये तिकीट न मिळाल्याने कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी नाट्य दिसून येत आहे. अशातच मनसेला मुंबईत मोठा धक्का बसला आहे.माजी नगरसेविका स्नेहल जाधव आणि त्यांचे पती माजी नगरसेवक सुधीर जाधव यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस स्नेहल जाधव यांनी काल तडकाफडकी पक्षाच्या सरचिटणीसपदाचा राजीनामा दिला. त्या आणि त्यांचे पती माजी नगरसेवक सुधीर जाधव हे राज ठाकरे यांचे निकटवर्तीय, विश्वासू म्हणून ओळखले जायचे. वार्ड क्रमांक 192 मधून उमेदवारी जाहीर करताना त्यांना विश्वासात न घेतल्याने त्या नाराज असल्याची माहिती समोर आली.

मनसेकडून वार्ड क्रमांक 192 या जागेसाठी यशवंत किल्लेदार यांना उमेदवारी जाहीर होताच अनुभवी नेत्या स्नेहल जाधव यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. हा वॉर्ड दादर भागात येतो. त्यामुळे मनसेला मोठा धक्का बसला आहे. गेल्या 20 वर्षांपासून जाधव कुटुंबाचा या वॉर्डवर प्रभाव आहे. 1992 ते 2007 या काळात स्नेहल जाधव स्वतः तीन वेळा नगरसेविका होत्या. तर 2007 ते 2012 मध्ये त्यांचे पती श्रीधर जाधव या वॉर्डातून निवडून आले होते.

अखेर नाराजी नंतर स्नेहल जाधव यांनी पती सुधीर जाधव यांच्यासोबत शिंदेंच्या शिवसेनेत आपल्या समर्थकांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून भावी वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.

       

आगामी निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची मुंबई महापालिका निवडणुकीसाठी युती झाली आहे. दोन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढवत आहे. जागा वाटपात मात्र मोठी असमानता दिसून येत आहे. मनसेच्या तुलनेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने बऱ्याच जागा पदरात पाडून घेतल्या आहेत. मात्र निवडणुकीच्या तोंडावर मनसेला मोठा धक्का बसला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!