एकनाथ शिंदेंना मोठा धक्का ; दोन बडे नेते भाजपात, चव्हाणाचां गेमप्लॅन यशस्वी?

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्यानंतर महायुतीतील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे.डोंबिवलीत शिंदे गटातील दोन प्रभावी स्थानिक नेत्यांना आपल्या गळाला लावत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शिंदेंची कोंडी केली आहे.
शिवसेना शिंदे गटाचे कल्याण ग्रामीण उपतालुकाप्रमुख विकास देसले आणि शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते सदानंद थरवळ यांचे पुत्र अभिजीत थरवळ यांनी शिंदेंची साथ सोडत भाजपचे कमळ हाती घेतले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंना मोठा धक्का बसला आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या दिल्ली वारीनंतरही महायुतीतील घटक पक्षातील एकमेंकांचे पदाधिकारी-कार्यकर्ते यांची फोडाफोडी चालूच आहे.दिल्लीतून केंद्रीय मंत्र्यांच्या भेटीनंतर निरोप आल्यानंतरही भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या निरोपाला केराची टोपली दाखवली आहे.रवींद्र चव्हाण यांनी पुन्हा शिवसेनचे नेते, उपमुख्यमंत्री एकानाथ शिंदे यांना धक्का दिला आहे. चव्हाणांनी डोबिंवलीमधील शिवसेनेचे दोन नेते फोडल्याने महायुतीत धूसफूस पुन्हा वाढली आहे.शिवसेनेचे कल्याण ग्रामीण उपतालुकाप्रमुख विकास देसले आणि नेते सदानंद थरवळ यांचा मुलगा अभिजित थरवळ यांनी रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थिती भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशामुळे अस्वस्थ झालेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या मंत्र्यांनी थेट मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यात शिवसेनेचे अनेक पदाधिकारी यांनी सेनेला जय महाराष्ट्र करीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत येथील राजकीय समीकरणे बदलणार आहेत.एकनाथ शिंदे यांचे पदाधिकारी हे भाजपमध्ये प्रवेश केल्याने ठाणे जिल्ह्यात काही ठिकाणी महायुतीत तणाव देखील निर्माण झाला आहे.

