एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! तीन महत्वाकांक्षी योजना बंद, फडणवीसांचा सर्वात मोठा निर्णय…


मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांच्या कार्यकाळात लोकसभा आणि विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी अनेक योजना सुरु करण्यात आल्या होत्या. त्यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या तीन महत्वाच्या योजना आता बंद होण्याच्या मार्गावर असल्याचे समोर आले आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने या योजनांसाठी निधी दिला नसल्याने त्या बंद पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या योजनांमध्ये आनंदाचा शिधा, १० रुपयांची शिवभोजन थाळी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी तीर्थाटन योजना यांचा समावेश आहे.

शिंदे सरकारच्या कार्यकाळात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या योजना जाहीर करण्यात आल्या होत्या. मात्र, निवडणूक जिंकल्यानंतर महायुती सरकारने त्यांचा आढावा घेतला आणि राज्याच्या आर्थिक तिजोरीवर होणारा ताण पाहता त्या केवळ कागदावर राहणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

शिंदे सरकारच्या कार्यकाळात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या योजना जाहीर करण्यात आल्या होत्या. मात्र, निवडणूक जिंकल्यानंतर महायुती सरकारने त्यांचा आढावा घेतला आणि राज्याच्या आर्थिक तिजोरीवर होणारा ताण पाहता त्या केवळ कागदावर राहणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. विशेषतः आनंदाचा शिधा योजना, जी दसरा, दिवाळी, गणेशोत्सव, गुढीपाडवा आणि शिवजयंती अशा प्रमुख सणांच्या वेळी लागू केली जात होती, तिला यंदा निधी मिळालेला नाही.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुरू केलेली १० रुपयांची शिवभोजन थाळी योजना एकनाथ शिंदे सरकारने पुढे चालू ठेवली होती. मात्र, या योजनेसाठीही निधी मिळालेला नाही. त्यामुळे राज्यातील अनेक ठिकाणी शिवभोजन केंद्रे बंद पडण्याची शक्यता आहे.

त्याचप्रमाणे, ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत तीर्थयात्रा योजना देखील बंद होण्याच्या मार्गावर आहे. अर्थसंकल्पात या योजनेसाठी कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही. त्यामुळे ती बंद पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!