एकनाथ शिंदेंना मोठा धक्का ; ‘या’ महापालिकेत पाच उमेदवारांचे अर्ज बाद


पुणे:राज्यात महानगरपालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असताना अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. या महापालिकेसाठी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जामधील पाच अर्ज बाद झाले आहेत. त्यामुळे निवडणुकीपूर्वी शिंदेंना मोठा धक्का बसला आहे.

अहिल्यानगर महापालिका निवडणुकीसाठी सर्वाधिक म्हणजेच 54 उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या शिंदेसेनेच्या पाच उमेदवारांचे अर्ज छाननीअंती अवैध ठरवण्यात आले आहेत. त्यामुळे निवडणूक रणांगणात शिंदेसेनेचे उमेदवार आता 49 वर आले असून, हा पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

दरम्यान महापालिकेच्या 68 जागांसाठी एकूण 788 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. बुधवारी विविध निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर अर्जांची छाननी प्रक्रिया पार पडली. या प्रक्रियेत एकूण 17 अर्ज अवैध ठरवून बाद करण्यात आले होते.

       

दरम्यान आजपासून उमेदवारी अर्ज माघारीचा पहिला दिवस असून 2 जानेवारी 2026 पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. त्यामुळे कोणते उमेदवार माघार घेतात, कोणत्या प्रभागात लढत रंगते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. माघारीनंतरच अहिल्यानगर महापालिकेतील अंतिम राजकीय समीकरण स्पष्ट होणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!