काँग्रेसला मोठा धक्का; लवकरच’ हा’ शिलेदार साथ सोडून भाजपात जाणार?


पुणे : राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची कोणत्याही क्षणी घोषणा होऊ शकते. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना चांगला वेग आला असताना परभणी जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का बसणार आहे.
काँग्रेसचा शिलेदारच भाजपाच्या वाटेवर जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार,काँग्रेसचे परभणी जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार सुरेश वरपूडकर यांनी मुंबईत मंत्री तथा भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे आता राजकीय वर्तुळात अनेक तर्क लावले जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते भाजपात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. परभणी तशा चर्चा चालू आहेत. असे असतानाच वरपूडकर यांनी बावनकुळे यांची भेट घेतली आहे. त्यामुळे या भेटीनंतर आता त्यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चेला बळ मिळाले आहे.

राज्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपात येणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने भाजपला अधिक बळ मिळणार आहे. दरम्यान माजी मंत्री सुरेश वरपूडकर यांनी मुंबईत भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भेटीत वेगवेगळ्या विषयावर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!