मोठी बातमी! राज्यात काँग्रेसला मोठा धक्का, बड्या नेत्याचा राजीनामा, राजकीय वर्तुळात खळबळ..

मुंबई : राज्याच्या राजकारणता सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. पुढील काही महिन्यांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ शकतात. मात्र आता त्यापूर्वीच राज्यात काँग्रेसला सर्वात मोठा धक्का बसला आहे.
यापूर्वी देखील महाविकास आघाडीमधील अनेक दिग्गज नेत्यांनी महायुतीची वाट धरल्याचं पाहायला मिळत आहे. याचा सर्वाधिक फटका हा शिवसेना ठाकरे गटाला बसला आहे, आणि त्यानंतर काँग्रेसचा नंबर लागतो, काँग्रेसमधल्या देखील अनेक नेत्यांनी महायुतीमध्ये पक्ष प्रवेश केला आहे.
जळगाव जिल्ह्यातील काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा आणि आदिवासी नेत्या म्हणून ओळख असलेल्या प्रतिभा शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
दोन वर्षांपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या आणि लगेचच प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्त झालेल्या शिंदे यांनी अचानक राजीनामा दिल्याने विविध चर्चांना उधाण आलं आहे. विशेष म्हणजे, त्यांचा पुढील राजकीय प्रवास राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडे वळण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे.
महाविकास आघाडीतील नेत्यांची महायुतीकडे होणारी सततची पलायनं शिवसेना (ठाकरे गट) आणि काँग्रेस दोघांसाठीही डोकेदुखी ठरत आहेत. यापूर्वी अनेक दिग्गज नेत्यांनी महायुतीत प्रवेश केला असून, त्याचा फटका सर्वाधिक ठाकरे गटाला बसला आहे. आता प्रतिभा शिंदे यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसलाही धक्का बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लवकरच अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रतिभा शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकतात. येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे.