काँग्रेसला मोठा धक्का ; माजी प्रदेशाध्यक्षांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, काय आहे प्रकरण?


पुणे : काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री रणजित देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. धनादेश न वटवल्याच्या प्रकरणात त्यांच्या विरोधात अटक वॅारंट जारी करण्यात आले आहे. त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विशेष प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयाने धनादेश न वटवल्याच्या प्रकरणात रणजीत देशमुख यांच्यासह तिघांविरोधात अजामीनपात्र अटक वॅारंट जारी केले आहे. अन्य आरोपीमध्ये पल्लवी पारिख, भावीन पारिख व अमित धुपे यांचा समावेश आहे. हे सगळे ही पर्सेप्ट वेब सोल्युशन कंपनीचे संचालक आहेत.

या प्रकरणात याचिकाकर्ते अतुल देवगडे यांनी याचिका दाखल केली होती. त्यांनी असे म्हटले आहे की, परसेप्ट वेब सोल्यूशन प्रा. लिमिटेडच्या संचालकांनी संगणक, इंटरनेट आणि वेबसंदर्भातील साहित्य खरेदी केले होते. रणजित देशमुख, पल्लवी पारेख आणि अमित धुपे हे या कंपनीचे संचालक आहेत. कंपनीने 11,50,000 रुपयांचे 5 धनादेश दिले होते. मात्र यातील एकही धनादेश त्यांनी वठवला नाही.

या धनादेश अनादर प्रकरणांमध्ये वारंवार पाठपुरावा करून आणि कायदेशीर नोटीस पाठवूनही त्यांच्याकडून उत्तर मिळत नव्हते.तसेच ते न्यायालयात हजेरी लावत नसल्यामुळे न्यायालयाने तिघांविरोधात अजामीनपात्र अटक वारंट जारी केले. त्यामुळे रणजित देशमुख यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!