भाजपला मोठा धक्का! मुख्यमंत्री फडणवीसांच्या विश्वासू सहकाऱ्याची राजकारणातून निवृत्ती ; काय आहे कारण?


पुणे : राज्यातील महापालिकेच्या निवडणुकीच्या निकालात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यानंतर भाजपला मोठा धक्का बसला आहे.भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी संदीप जोशी यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आहे.

कोण आहेत संदीप जोशी?

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ते विश्वासू सहकार्य आहेत.संदीप जोशी हे नागपूरमधील एक अनुभवी आणि सक्रिय राजकारणी आहेत. संदीप जोशी यांनी नगरसेवक म्हणून सुरूवात केली. त्यानंतर नागपूरचे महापौर म्हणूनही काम पाहिले. २०१९ ते २०२० या काळात त्यांनी नागपूरचे महापौर म्हणून जबाबदारी सांभाळली. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी शहराच्या स्वच्छतेवर आणि पायाभूत सुविधांवर भर दिला.

संदीप जोशी यांनी घेतलेला निवृत्तीचाहा निर्णय भाजपसाठी नागपुरात मोठा धक्का मानला जात आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नागपूरच्या जनतेचे आणि आपल्या समर्थकांचे आभार मानले असून, राजकारण हे केवळ सत्तेसाठी नसून सेवेसाठी असल्याचे म्हटले आहे.

विधान परिषदेचे आमदार संदीप जोशी यांनी सध्याच्या राजकीय संस्कृती, पक्षांतर आणि निष्ठावान कार्यकर्त्यांवरील अन्यायाबाबत स्पष्ट भूमिका मांडली आहे. १३ मे रोजी आमदारकीची मुदत पूर्ण झाल्यानंतर कोणतेही पद स्वीकारणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. दरम्यान संदीप जोशी यांनी केलेल्या निवृत्तीच्या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

या निवृत्तीच्या निर्णयानंतर संपूर्ण भूमिका व निर्णयाचे कारण स्पष्ट करणारे त्यांचे भावनिक पत्र देखील त्यांनी फेसबूकवर पोस्ट केले आहे. मी यापुढे कोणतीही निवडणूक लढवणार नाही आणि कोणत्याही राजकीय पदावर राहणार नाही, असे पोस्टमध्ये म्हटल आहे. सध्याची राजकीय संस्कृती, पक्षांतर आणि निष्ठावान कार्यकर्त्यांवरील अन्यायामुळे हा निर्णय घेतल्याचे त्यांनी भावनिक पत्रातून स्पष्ट केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!