दिल्लीत अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का!! सात आमदारांनी एकाच दिवशी पक्ष सोडला…

दिल्ली : येथील विधानसभा निवडणूक सध्या जवळ आली आहे. याच पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीला मोठा धक्का बसला आहे. पार्टीचे सात आमदारांनी एकाच दिवशी पक्षाची प्राथमिक सदस्यता सोडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली असून ते कोणत्या पक्षात जाणार याबाबत माहिती पुढे आली नाही.

या आमदारांच्या पक्ष बदलामुळे पार्टीच्या नेतृत्वावर आणि त्याच्या भवितव्यासाठी संकट निर्माण झाले आहे. आम आदमी पार्टीने ज्या ईमानदारीच्या विचारधारेवर आधारित असलेल्या सत्तेसाठी काम केले होते, त्या विचारधारेपासून पार्टी सध्या किती दूर गेली आहे, असे त्यांनी सांगितले आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सध्या दिल्ली विधानसभा निवडणूक तोंडावर आली असून सगळे पक्ष तयारीला लागले आहेत. या आमदारांमध्ये त्रिलोकपुरीचे आमदार रोहित मेहरौलिया, जनकपुरीचे आमदार राजेश ऋषि, कस्तूरबा नगरचे आमदार मदनलाल, पालमचे आमदार भावना गौड़, महरौलीचे आमदार नरेश यादव यांचा समावेश आहे.

दरम्यान, दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आपला मोठा धक्का मानला जात आहे. या आमदारांच्या पक्ष सोडल्याने ‘आप’च्या कार्यकर्त्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. यामुळे विधानसभा निवडणुकीत नेमकं काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या सर्व घटनाक्रमावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. ‘आप’चे भवितव्य आता आपल्या नेत्यांच्या नेतृत्वावर आणि आगामी निवडणुकांच्या रणनितीवर अवलंबून असेल. याबाबत अरविंद केजरीवाल यांनी प्रतिक्रिया दिली नसून हे आमदार भाजपात जातील असे बोलले जात आहे.