शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा…!


नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२३-२४ साठीचा अर्थसंकल्प लोकसभेत सादर केला आहे. सादर झालेल्या अर्थसंकल्पात शेती व शेतकर्‍यांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत.

देशातील शेतक-यांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म उभारण्यात येणार आहे. कृषि स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी नवीन निधीची घोषणा करण्यात आली आहे. हा निधी आधुनिक तंत्रज्ञानासाठी वापरला जाणार आहे.

बाजरीचे जागतिक केंद्र बनविण्यावर र 

भारताला बाजरीचे जागतिक केंद्र बनविण्यावर भर देण्यात येणार आहे. तृणधान्यांसाठी ग्लोबल हब तयार करण्यात येणार आहे. बाजरीसाठी जागतिक स्तरावरील संशोधन संस्था बनवण्यात येणार आहे. पारंपरीक पद्धतीचे जे पदार्थ आपल्या रोजच्या जेवणात असतात त्यांना ग्लोबल करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. हॉर्टिकल्चरसाठी २२०० कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली आहे. कापसासाठी क्लस्टर आधारित मूल्य साखळी योजना राबविण्यात येणार आहे.

कृषि कर्जाचे लक्ष्य ११.१ टक्क्यांनी वाढून २० लाख कोटी रुपये

बचत गटांवर भर देऊन आर्थिक सक्षमीकरणावर सरकारचा भर असणार आहे. अन्नधान्य साठवणुकीसाठी अन्न साठवण विकेंद्रीकरण योजना करण्यात येणार आहे. सरकार कृषि क्षेत्रासाठी साठवण क्षमता – गोडाऊन वाढवणार आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात कृषि कर्जाचे लक्ष्य ११.१ टक्क्यांनी वाढून २० लाख कोटी रुपये करण्यात येणार आहे. पशुसंवर्धन, मत्स्यपालन, दुग्धव्यवसाय क्षेत्राला कर्ज देण्यावर भर देण्यात येणार आहे. मत्स्यपालनासाठी ६० हजार कोटी रुपयांच्या नवीन सवलतीच्या योजनेची घोषणा करण्यात आली आहे. शेतक-यांसाठी कोल्ड स्टोरेजची क्षमताही वाढवण्यात येणार आहे.

१० हजार बायो इनपुट रिसोर्स सेंटर्सची घोषणा

शेतक-यांना आधुनिक शेतीसाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पुढच्या तीन वर्षांत सरकार १ कोटी शेतक-यांना नैसर्गिक शेती करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे. यासाठी १० हजार बायो इनपुट रिसोर्स सेंटर्सची स्थापना करण्यात येणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!