अर्थसंकल्पातील मोठी घोषणा!मुंबई-पुणे हायस्पीड ट्रेन कॉरिडोर उभारणार,नेमका काय होणार फायदा?

पुणे : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांपासून ते युवकापर्यंत मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत.मंत्री निर्मला सीतारमण यांनी नवव्यांदा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात त्यांनी मुंबई पुण्यासाठी मोठी घोषणा केली आहे.लवकरच मुंबई-पुणे हायस्पीड ट्रेन कॉरिडोर उभारण्यात येणार आहे.

केंद्र सरकारच्या 2026 -27 च्या अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशात 7 नवीन हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर होतील, अशी घोषणा केली आहे. यामध्ये मुंबई पुणे हाय स्पीड ट्रेन कॉरिडोर उभारणार असल्याचं म्हटल आहे. त्यामुळे मुंबई-पुणे प्रवास खूप वेगवान होणार आहे. आता मुंबई पुणे, हैदराबाद या ठिकाणी हायस्पीड कोरिडॉर उभारण्यात येणार आहे.


या हाय स्पीड कॉरिडोरमुळे मुंबई आणि पुण्याचा प्रवास आता आणखी वेगवान होणार आहे. मुंबई-पुणे या दोन शहरांमध्ये नव्या हायस्पीड रेल्वे कोरिडॉरचे काम पूर्ण झाल्यानंतर मुंबई-पुणे या दोन शहरातील ट्रेन वेळेवर धावणार आहेत.
महाराष्ट्रातील पहिली सेमी हायस्पीड ट्रेन कॉरिडोर पुण्याला मिळणार आहे. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील प्रवास सुसाट होणार आहे. याचसोबत इतर राज्यांना देखील जोडले जाणार आहे.
अर्थसंकल्पातील 7 हायस्पीड रेल्वे कोरिडॉरची घोषणा?
मुंबई -पुणे हायस्पीड, पुणे- हैदराबाद,हैदराबाद-बंगळुरु, हैदराबाद-चेन्नई,चेन्नई-बंगळुरु,दिल्ली-वाराणसी,वाराणसी -सिल्लीगुरी
