लाडक्या बहि‍णींसाठी मोठी घोषणा!! जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत…


अहिल्यानगर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै २०२४ पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते.

या मदतीमुळे अनेक महिलांना मोठा फायदा झाला आहे. लाडक्या बहीण योजनेमुळे २०२४ विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळालेले आहे. अशातच आता या योजनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वात मोठी घोषणा केली आहे.

अहिल्यानगरच्या कोपरगावमध्ये बोलताना फडणवीसांनी लाडक्या बहि‍णींना मोठा दिलासा दिला आहे. अहिल्यानगरमधील कोपरगाव येथे नगराध्यक्षपदाचे भाजपा उमेदवार पराग संधान व नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ विजय संकल्प सभेत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, या सभेमध्ये दूर पर्यंत गर्दी दिसतेय.

जणू भाजपचे सर्व मतदार या सभेत आले आहेत असं दिसत आहे. 3 तास उशिर झाला तरी आपण थांबला आहात. याचा अर्थ तुम्ही भाजपला आशीर्वाद देण्याचा निर्णय घेतलाय. आता आम्ही आलो आहोत उमेदवार पराग संधान यांचं विकासाशी संधान बांधून देण्यासाठी.

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, सर्वात आधी लाडक्या बहिणींची आठवण ठेवावी लागते. जोपर्यंत तुमचा देवा भाऊ मुख्यमंत्री आहे , तोपर्यंत लाडक्या बहिणींचे पैसे कोणीच बंद करू शकणार नाही. या निवडणुकीत मी मतदान मागण्याकरिता आलो आहे मी कुणावरही टीका करणार नाही.

महाराष्ट्रातील नागरी भागाला कसं विकसित करायचं याची ब्ल्यू प्रिंट आमच्याकडे तयार आहे. विवेक भैय्यांनी मांडलेल्या विश्वासनाम्याला पूर्ण करण्याची जबाबदारी आमची आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!