निवडणूक आयोगाची मोठी घोषणा! उद्यापासून या १२ राज्यांमध्ये होणार SIR सुरु, असे असणार वेळापत्रक….


मुंबई : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेत महत्त्वाची घोषणा केली आहे. उद्यापासून देशभरातील १२ राज्यांमध्ये SIR (विशेष सखोल फेरनिरीक्षण) करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिली.

तसेच १२ राज्यांमध्ये SIR चा दुसरा टप्पा उद्यापासून सुरु होईल. या टप्प्यात मतदार यादी अद्ययावत केली जाईल. नवी मतदार जोडले जातील. सोबतच त्रुटी दूर केल्या जातील. दुसऱ्या टप्प्यात १२ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये विशेष सखोल फेरनिरीक्षण करण्यात येईल. यामध्ये अंदमान निकोबार, गोवा, पुद्दुचेरी, छत्तीसगढ, गुजरात, केरळ, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, लक्ष्यद्विप यांचा समावेश आहे.

दरम्यान, या यादीत महाराष्ट्राचा समावेश करण्यात आलेला नाही. राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. ३१ जानेवारीपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत.

बिहारमधील SIR च्या तयारीच्या आधारे, निवडक राज्यांमध्ये SIR सुरू केले जाईल. प्रत्येक मतदान केंद्रावर १००० मतदार असतील. SIR चा दुसरा टप्पा १२ राज्यांमध्ये सुरू होईल, असे मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले.

बिहारमधील मतदार यादीसाठी एसआयआर प्रक्रिया आधीच पूर्ण झाली आहे. अंदाजे ७.४२ कोटी नावे असलेली अंतिम यादी ३० सप्टेंबर रोजी प्रकाशित झाली. बिहारमध्ये मतदान ६ आणि ११ नोव्हेंबर रोजी दोन टप्प्यात होईल आणि १४ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होतील.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी यावेळी वेळापत्रक स्पष्ट केले. SIR चा दुसरा टप्पा उद्यापासून सुरू होईल. छपाई आणि प्रशिक्षण २८ ऑक्टोबर २०२५ ते ३ नोव्हेंबर २०२५ पर्यंत चालेल. ४ नोव्हेंबर २०२५ ते ४ डिसेंबर २०२५ पर्यंत घरोघरी जाऊन मतदारांची माहिती गोळा केली जाईल. ९ डिसेंबर २०२५ रोजी प्रारूप मतदार यादी सादर केली जाणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!