खरात प्रकरणात मोठी कारवाई! मुंबईच्या उपजिल्हाधिकाऱ्याची तडकाफडकी बदली, प्रकरण भोवलं?


मुंबई : राज्यभर गाजत असलेल्या नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे मुंबईतील शासकीय अधिकारी अडचणीत आला आहे. याप्रकरणी उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यांना खरातसोबत पत्नीच्या नावे गुंतवणूक करणं चांगलंच भोवलं आहे. त्यामुळे त्यांची बदली थेट मंत्रालयामध्ये करण्यात आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबईतील अतिरिक्त जिल्हाधिकारी अभिजित भांडे पाटील यांनी अशोक खरातच्या मुलगी आणि बायकोच्या नावावर असलेल्या जमिनीमध्ये गुंतवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. अशोक खरातशी संबंधित अनेक कामांमध्ये अभिजीत भांडे पाटील यांनी गुंतवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता या प्रकरणात त्यांची देखील चौकशी होण्याची शक्यता आहे.

अभिजीत भांडे यांची मंत्रालयातील झोपडपट्टी पुनर्वसन विभागात बदली करण्यात आली आहे. त्यांच्याबरोबर अनेक महसूल अधिकारी देखील रडारवर आहेत.याआधी अशोक खरात प्रकरणामुळे रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. रुपाली चाकणकर यांचे अशोक खरात यांच्यासोबतचे फोटो व्हायरल झाल्यानंतर त्याच्या राजीनाम्याची आणि अटकेची मागणी केली जात आहे.

आता या खरात प्रकरणात आधी राजकीय नेते आणि शासकीय अधिकाऱ्यांची नावं समोर येत असल्यामुळे प्रकरणाची व्याप्ती वाढत चालली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!