मोठी दुर्घटना! दुबई एअर शोदरम्यान भारताचं’ तेजस’ विमान कोसळलं, काय आहे कारण?


पुणे : दुबई येथे सुरू असलेल्या प्रतिष्ठित ‘दुबई एअर शो’ दरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे. भारतीय हवाई दलाचे एचएएल तेजस लढाऊ विमान प्रात्यक्षिक उड्डाण करत असताना कोसळल असल्याची धक्कादायक माहिती सुरू झाली आहे. दरम्यान हे विमानाच्या पायलट बाबत अद्याप कोणतेही माहिती मिळू शकलेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक वेळेनुसार दुपारी २:१० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. तेजस हे विमान मोठ्या जनसमुदायासमोर हवाई प्रात्यक्षिके करत असताना अल मक्तूम आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या एअरफील्डच्या दूरच्या बाजूला खाली कोसळले.पायलटच्या सुरक्षिततेबद्दल तातडीने कोणतीही स्पष्ट माहिती उपलब्ध होऊ शकली नाही, पायलट बाहेर पडला की नाही, याबाबत अनिश्चितता होती. मात्र परिसरात धूर आणि आगीचे लोळ उठल्याच दिसून आलं.ज्यामुळे एअर शो पाहण्यासाठी जमलेल्या लोकांमध्ये, विशेषतः लहान मुलांसह आलेल्या कुटुंबांमध्ये, भीतीचे वातावरण निर्माण झाले.

भारताच्या स्वदेशी बनावटीचे तेजस लढाऊ विमान आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची संरक्षण क्षमता दर्शविण्यासाठी दुबई एअर शोमध्ये सहभागी झाले होते. यापूर्वीही तेजसच्या कामगिरीबद्दल सोशल मीडियावर काही अफवा पसरल्या होत्या, ज्या भारतीय सरकारने तांत्रिक माहिती देऊन खोट्या ठरवल्या होत्या. मात्र आता ही दुर्घटना घडल्यामुळे या विमानाची आंतरराष्ट्रीय स्तरावरची प्रतिमा आणि विश्वासार्हता पुन्हा एकदा चर्चेत येण्याची शक्यता आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!