मोठी दुर्घटना! रायगडमध्ये दरड कोसळुन वृद्ध महिलेचा मृत्यू…


रायगड : गेल्या चार ते पाच दिवसापासून मुंबई, ठाणे, रायगडसह राज्यातील काही भागाला मुसळधार पावसाने झोडपून काढलं आहे. या मुसळधार पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली असताना आता रायगडमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे.जिल्ह्यातील मुरुड तालुक्यामधील मिठेखार गावात आज दरड कोसळून एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, विठाबाई गायकर (वय ७५वर्षे) असं मृत झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे.रायगड जिल्ह्यातील दरड प्रवण ग्रस्त म्हणून जाहीर केलेले मुरुड तालुक्यातील मौजे मिठेखार येथे आज सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास वृद्ध महिला विठाबाई या त्यांच्या दुकानात असताना त्यांना दुकानाच्या मागे एक त्यांना मोठा आवाज आल्याने त्या तिथे पाहण्यासाठी गेल्या असता दुकानलगत असलेल्या डोंगरावरून मातीचा ढिगारा हा दुकानाच्या भिंतीवर आला आणि भिंत ही विठाबाई यांच्या अंगावर पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

दरम्यान या घटनेची माहिती मिळताच ग्रामपंचायत सरपंच, ग्राम विकास अधिकारी सदस्य हे ग्रामस्थासहित घटना स्थळी दाखल झाले होते. या झालेल्या दुर्घटनेची माहिती मुरुड तहसीलदार यांना दिली असता मुरुड तहसीलदार आदेश ढापाल यांनी घटनास्थळी येऊन पाहणी करीत सुरक्षितेबाबत उपाय योजना करण्याच्या सूचना उपस्थित अधिकारी यांना दिल्या आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!