मोठी बातमी! छगन भुजबळ यांचा कुणबीतून मराठा आरक्षणाला तीव्र विरोध, १०% स्वतंत्र आरक्षण मिळाले आहे तर आरक्षण कशाला..!!


मुंबई : राज्यभरात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना राज्याचे मंत्री छगन भुजबळ हे कुणबी आरक्षणाला विरोध करीत आहे. राज्य सरकारने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिले आहे. तर कुणबी आरक्षण कशासाठी पाहिजे , मंग ते १० टक्के आरक्षण कुणासाठी, असा सवाल छगन भुजबळ यांनी केला आहे.

त्यानंतर भुजबळ यांनी पत्रपरिषद घेऊन मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध दर्शवला आहे. ओबीसीत आधीच ५४ टक्के समाज आहे, ३७४ जाती आहेत. त्यामुळे मराठासारखा बलदंड समाज आला तर कुणालाच काही मिळणार नाही.

सरकार एका जातीलाच वेगळे आरक्षण देत आहे. तर त्यांनी ओबीसीत येण्याचा प्रयत्न का करावा, असा सवालही त्यांनी केला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी यापूर्वी लाखांचे मोर्चे निघाले आहे. शांततेत व कुठेही कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही.

परंतु, यावेळी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. बीडमध्ये घरे, गाड्या, ऑफीस पेटविले आहे. जखमींना दवाखान्यात नेताना दगडफेक झाली व त्यात ८० पोलीस जखमी झाले आहे. मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्यावे, ओबीसीतून नको, अशी आमची मागणी होती, असे भुजबळ म्हणाले आहे.

कुणबीकरणाला विरोध

राज्यात कुणबी प्रमाणपत्र वाटण्यालाही भुजबळ यांनी विरोध दर्शवला आहे. राज्यात कुणबीकरणाचे प्रयत्न सुरू असून, त्यात बोगस प्रमाणपत्र वाटली जात असल्याचा आरोप भुजबळ यांनी केला आहे. यासंदर्भात आपल्याकडे पुरावे असल्याचे सांगत त्यांनी खाडाखोड केलेली प्रमाणपत्रे दाखवली आहे. ते म्हणाले, मागासवर्गीय असलेल्यांनाही कुणबी प्रमाणपत्र वाटप झाले आहे.

वंजारी व्यक्तीलाही कुणबी प्रमाणपत्र देण्यात आले. हाताने खोडून दाखल्यावर मराठा कुणबी लिहिले जात आहे. काहींना मराठी कुणबी असेही प्रमाणपत्र मिळाले आहे. एका दाखल्यावर मराठा तर दुसर्‍या प्रमाणपत्रावर कुणबी उल्लेख आहे. या कुणबीकरणाला आमचा विरोध आहे, ते थांबवले पाहिजे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!