भुजबळांनी जरांगेना डिवचंल ; ईडब्ल्यूएस की ओबीसी?कट ऑफ वरून पेचात पकडलं..


पुणे : राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वादंग सुरू आहे.सरकारने मराठा आरक्षणाच्या काढलेल्या जीआरवर भुजबळ यांनी नाराजी देखील व्यक्त केली. आज त्यांनी पुन्हा नवा डाव टाकत ईडब्ल्यूएस की ओबीसी, कोणत्या आरक्षणाचा फायदा कशात आणि नुकसान तरी कुणाचं? याचं गणित मांडल आहे.

ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी एसईबीसी आरक्षणावर मत मांडलं आहे. माजी पंतप्रधान व्ही.पी. सिंग यांनी जेव्हापासून मंडळ आयोग स्थापन केला तेव्हापासून आम्ही कोर्टाच्या पायऱ्या चढतो आहे.आमची केस सुप्रीम कोर्टाच्या नऊ बेंच समोर गेली तिथून त्याला व्यवस्थित चाळणी लावून ओके करून घेतलं. कोर्टाच्या पायऱ्या या चढावाच लागतात या लढाया सुरूच असतात, असे ते म्हणाले.तर ईडब्ल्यूएस या दहा टक्के आरक्षणांमध्ये फक्त एकच समाज आहे. पंतप्रधान मोदी यांनी जे आरक्षण दिलं त्यात देखील 80 / 90% एकच समाज आहे. आम्ही ओबीसी , दलित आदिवासी यात बांधल्या गेल्यामुळे आम्हाला तिकडे जाता येत नव्हतं. तुम्हाला ते नकोय तुम्हाला EWS दिले त्यात 80 टक्के तुम्ही आहात.तरी सुधा तुम्हाला ओबीसी पाहिजे कशासाठी असा सवाल त्यांनी केला आहे.

दरम्यान भुजबळ यांनी कट ऑफ आधारे कोणते आरक्षण फायदेशीर आहे हे सांगण्याचा प्रयत्न अप्रत्यक्षरित्या केला आहे. मराठा आरक्षण ईडब्ल्यूएसमध्ये येते. मेडिकल मध्ये व इतर क्षेत्रात ओबीसींचा कट ऑफ पॉईंट वरती आहे. तर ईडल्ब्यूएसचा कटऑफ खाली आहे. मग हा फायदा आहे की नुकसान आहे, असा सवाल त्यांनी विचारला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!