भोंदू बाबाला’ त्या’ प्रकरणात 4 वर्षाची सक्तमजुरी अन् 15 हजार रुपयांचा दंड, बारामती न्यायालयाचा मोठा निर्णय..

पुणे : नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यानंतर भोंदू बाबांची अनेक प्रकरण राज्यातून उघडकीस येत आहेत. अशातच आता बारामतीत पैशाचा पाऊस पाडण्याच आमिष दाखवत महिलांवर लैंगिक अत्याचार करून जादूटोणा करणारा भोंदू बाबा मिलिंद मदन जाधव( वय 50,रा.धुपवे, तालुका -गुहागर, जिल्हा- रत्नागिरी) याला बारामती न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. त्याला चार वर्षाची सक्तमजुरी आणि 15000 रुपयाची दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

काय आहे प्रकरण?
पैशाच्या पावसाचं अमिष दाखवत महिलांचे लैंगिक शोषण, फसवणूक आणि जादूटोण्याच्या बहाण्याने भोंदू बाबा मिलिंद मदन जाधव यांने बारामतीत राहणाऱ्या एका महिलेला पैशाचा पाऊस पाडायचा असून यासाठी पूजा करावी लागेल.या बहाण्याने महाबळेश्वर येथे बोलावून घेत पूजा केली. तसेच दुसरी पूजा करण्यासाठी नग्न अवस्थेत डोळे झाकून पूजेला बसावे लागेल असे सांगितले. त्याचबरोबर तिच्याकडे शरीर संबंध केल्याशिवाय पैशाचा पाऊस येणार नाही असेही सांगितल्याचं तिने सांगितलं.

15 ऑगस्ट 2024 ते 23 सप्टेंबर 2024 या कालावधीत बारामती महाबळेश्वर आणि साताऱ्यात ही घटना घडली. संबंधित महिलेला पैशाच्या आमिषाला भूलवण्यात आले. जादू टोण्याच्या नावाखाली तिची आर्थिक फसवणूक केली गेल्याची तिच्या लक्षात आले. फिर्यादीने तिच्याकडून 14000 तर तिचे एका मैत्रिणीकडून 50 हजार रुपये देखील घेतले होते.
आपली फसवणूक झाल्याची लक्षात आल्यानंतर संबंधित महिलेने पोलिसात धाव घेत त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी त्याच्या विरोधात शारीरिक अत्याचारासह,महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला होता. या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक धनश्री भगत यांनी करत आरोपी विरुद्ध बारामती न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले.
या खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने ऍड ज्ञानदेव शिंगोडे यांनी काम पाहिले. सात साक्षीदार तपासले असता आणि एडवोकेट शिंगोडी यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायाधीश पाटील यांनी भारतीय न्याय सहिता 318 (4) नुसार जाधव याला दोषी ठरवत दोन वर्षे शिक्षा व 5 हजार रुपये दंड तर जादूटोणा कायद्यान्वये चार वर्षे सत्ता मजुरी व दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.
सरकार पक्षाला या खटल्यात पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, उपनिरीक्षक गोरख कस्पटे,सहाय्यक उपनिरीक्षक अभिमन्यू कवडे, हवालदार रेणुका पवार,न्यायालय लिपिक सुनीता कांबळे यांचे सहकार्य मिळाले.