Bhole Baba : हाथरस घटना नेमकी कशामुळे घडली? बोले बाबा यांची आलिशान गाडी गेली, त्याच्यामागे भक्त पळाले अन्….; बाबा फरार, भयंकर माहिती आली समोर


Bhole Baba : उत्तर प्रदेशच्या हाथरस याठिकाणी एक भयंकर दुर्घटना झाल्याचे समोर आले आहे. हाथरस जिल्ह्यातील सिकंदराबाद येथे भोले बाबा यांच्या प्रवचन कार्यक्रमात चेंगराचेंगरीची दुर्घटना झाली आहे. भोले बाबांच्या सत्संगाच्या या भव्य कार्यकमात घडलेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेने अनेक भक्तांचे बळी घेतले आहेत. या घटनेने नंतर एकच खळबळ उडाली आहे.

आयोजनासाठी जिल्हा दंडाधधिकार्‍याची रीतसर परवानगी घेण्यात आली होती तब्बल ५० हजारापेक्षा अधिक भाविक या ठिकाणी आले होते. भोले बाबा ची गाडी येणार म्हणून भाविकांना थांबवून ठेवले होते आणि भोले बाबा ची गाडी गेली तेव्हा भाविक धावायला लागले धावताना मोठी गर्दी झाली एकमेकांच्या अंगावर लोक पडत गेले आणि चेंगराचेंगरी होत गेली.

भोले बाबा कोण आहेत?

दरम्यान हा अपघात होता की घातपात, याची देखील चौकशी करा अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत, पण हा भोले बाबा कोण? हा या निमित्ताने प्रश्न निर्माण झाला आहे. भोले बाबा आता फरार तर झाला आहे हा भोले बाबा म्हणजेच नारायण साकार हरी! खरे तर सुरज पाल सिंह असं त्याचं नाव. याचा भोले बाबा कसा झाला ही सारी गमतीशीर कहाणी आहे.

गुन्हे अन्वेषण विभागात पोलीस कॉन्स्टेबल असलेला सुरज पाल सिंह जन २४ वर्षांपूर्वी पोलीस दलातील नोकरी सोडली. त्यानंतर तो कोठे गेला होता याची माहिती नाही, पण त्यानंतर अचानक त्याने धार्मिक प्रवचने देण्यास सुरुवात केली. त्याचा दावा आहे की, १८ वर्षांची नोकरी केल्यानंतर त्याला देवाचा साक्षात्कार झाला आणि त्याने पटियाली मध्ये स्वतःचा आश्रम बनवला. Bhole Baba

दीड वर्षांपूर्वी या सिकंदरराऊ, फुलहारी गावात त्याने ट्रस्ट बनवला. त्याचे लग्न झाले असून त्याला मूलबाळ नाही, पण उत्तर प्रदेशातील आग्रा, हाथरस, अलीगडसह राजस्थानमध्ये देखील त्याचा प्रभाव आहे.

दरम्यान, असं सांगितलं जातं की अनेक आयएएस आयपीएस अधिकारी त्याचे भक्त आहेत अर्थात हा बाबा भगवी कपडे घालत नाही तर पांढरा सूट आणि पांढरे बूट पांढऱ्या रंगाच्या सुटा बुटात फिरतो प्रत्येक मंगळवारी याच्या आश्रमात सत्संग असतो त्याचे स्वयंसेवक मात्र काळ्या कपड्यांमध्ये फिरतात.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!