Bhiwandi Lok sabha : शरद पवारांनी भिवंडीसाठी बाळ्यामामाला उमेदवारी दिली अन् २४ तासाच्या आत एमएमआरडीएने केली कारवाई, नेमकं घडलं काय?


Bhiwandi Lok sabha : लोकसभा निवडणुकीसाठी भिवंडी लोकसभेसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भिवंडी लोकसभा प्रभारी सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

उमेदवारी जाहीर करताच २४ तासाच्या आत बाळ्यामामांवर एमएमआरडीए कडून कारवाई करण्यात आली. भिवंडी लोकसभा मतदारसंघातील येवई येथील आर के लॉजिक पार्क यातील गोदाम बांधकामावर कारवाई करण्यासाठी एमएमआरडीए ने नोटीस बजावली आहे.

तसेच यानंतर बाळ्या म्हात्रे यांनी कपिल पाटलांवर निशाणा साधला आहे. ज्यांचे घर काचेचे असते ते दुसऱ्यांच्या घरावर दगड मारू शकत नाहीत, पाठीमागून वार करण्यापेक्षा समोरून लढा असा आव्हान बाळ्या मामा म्हात्रे यांनी कपिल पाटील यांना दिले आहे.

दरम्यान बाळ्यामामा म्हात्रे यांनी या संदर्भात सांगितले की, मी उभ्या केलेल्या गोदाम व्यवसायातून तब्बल ९० हजार युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. तालुक्यात अनधिकृत गोदाम व्यवसाय भ्रष्टाचाराची जननी हे कपिल पाटील हेच आहेत. Bhiwandi Lok sabha

तालुक्यातील गोदाम बांधकामांना संरक्षण देण्यासाठी शासनाने अध्यक्ष काढले आहेत, त्यानुसार सर्व बांधकाम संरक्षण करण्यासाठी प्रस्ताव दाखल केला असून उच्च न्यायालयातून स्थगिती आदेशही घेतला आहे असं स्पष्टीकरण बाळा मामा म्हात्रे यांनी दिले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!