Bhima Patas Sugar Factory : भीमा पाटस कारखान्याच्या अहवालाची पाटसच्या ग्रामस्थांनी केली होळी, अध्यक्ष राहुल कुल यांच्यावर जोरदार टीका, नेमकं घडलं काय?


Bhima Patas Sugar Factory  दौंड : गेल्या काही दिवसांपासून दौंड तालुक्यातील पाटस येथील भीमा सहकारी साखर कारखाना चर्चेत आला आहे. संजय राऊत यांनी यावर आरोप केले होते. असे असताना आता पुन्हा एकदा हा कारखाना चर्चेत आला आहे. Bhima (Patas Sugar Factory)

आता कारखान्याच्या ४१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस व अहवाल सभासदांना वाटप करण्यात आला आहे. मात्र या अहवालामध्ये भीमा पाटस सहकारी कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष व सहकार महर्षी स्वर्गीय मधुकरराव गंगाजीराव शितोळे यांचे नाव व फोटो छापला नाही.

यामुळे पाटस ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी या अहवालावर तीव्र आक्षेप घेतला असून अहवलाची ग्रामपंचायत कार्यालयासमोरील स्वर्गीय मधुकरराव शितोळे यांच्या पुतळ्यासमोर होळी करून निषेध व्यक्त केला. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याची ४१ वी अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याचे अध्यक्ष ॲड. राहुल कुल यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी दुपारी एक वाजता होणार आहे. असे असताना आतापासून वातावरण तापले आहे.

भीमा पाटस कारखान्याच्या सर्व साधारण सभेच्या अगोदरच भीमा पाटस कारखान्याचे संचालक मंडळ वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. अहवालातुन पाटसचे भूमिपुत्र दौंड तालुक्याचे भाग्यविधाते कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष मधुकरराव शितोळे यांचा नामोल्लेख व फोटो वगळला आहे. यामुळे राहुल कुल यांच्यावर टीका केली जात आहे.

भीमा पाटसच्या कारखान्याच्या संचालक मंडळाच्या या कृतीचा पाटस ग्रामपंचायत कार्यालयामध्ये निषेध करण्यात आला आहे. याठिकाणी सभा घेऊन व काळ्या फिती लावून निषेध नोंदवण्यात आला. यावेळी सभासद उपस्थित होते.

तसेच ग्रामपंचायत कार्यालयासमोरील स्वर्गीय मधुकरराव शितोळे यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून या वार्षिक अहवालाची होळी करून निषेध करण्यात आला. स्वर्गीय मधुकराव शितोळे यांनी सन १९७५ ते १९८० च्या दरम्यान दौंड तालुक्यात दिवस रात्र फिरून शेतकरी वर्गाला कारखान्याचे महत्व पटवून, पैसा गोळा करून करून कारखान्याची उभारणी केली.

तसेच यामुळे प्रत्येक गावातील मुलांना कारखान्यात नोकरी उपलब्ध करून दिली. यामुळे अनेकांचे संसार यातून उभे राहण्यास मोठी मदत झाली. यामुळे याचा अनेकांना फायदा झाला. मात्र कारखान्याचे अध्यक्ष आमदार कुल व संचालक मंडळाला स्व.मधुकरराव शितोळे यांचा विसर पडला आहे.

त्यांनी चालूचा ४१ व्या वार्षिक अहवाल सादर करत असताना कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष स्व. मधुकाका शितोळे यांचा नामोल्लेख व फोटो वार्षिक अहवालावर जाणीवपूर्वक छापण्यात आला नाही. यामुळे सभासद आक्रमक झाले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!