भटिंडा मिलिटरी स्टेशनमध्ये गोळीबारात चार जवानांचा मृत्यू…!
भटिंडा : पंजाबमधील भटिंडा येथील लष्करी स्टेशनवर पहाटे साडेचारच्या सुमारास अज्ञात हल्ले खोराने गोळीबार केला त्या हल्यात चार जवान शहीद झाले आहेत. लष्कराच्या एका अधिका-यांने ही माहिती दिली आहे. मात्र, लष्कराच्या अधिका-यांनी अद्याप या घटनेच्या कारणांची माहिती दिलेली नाही. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या घटनेबाबत लष्कराकडून अहवाल मागवला आहे.
लष्कराच्या अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंजाबमधील भटिंडा येथील लष्करी स्टेशनवर झालेल्या गोळीबारात जखमी झालेल्या चार जवानांचा बुधवारी पहाटे मृत्यू झाला. ही घटना पहाटे साडेचारच्या सुमारास घडल्याचे लष्कराच्या अधिका-यांनी सांगितले. ते म्हणाले घटनेची सर्व बाजू तपासली जात आहे. मिलिटरी स्टेशनमधून हरवलेल्या रायफलचीही चौकशी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पंजाब पोलिस या घटनेची लष्कराच्या अधिका-यां सोबत संयुक्त तपास करत आहेत. पंजाब पोलिसांनी हा ‘दहशतवादी हल्ला असल्याचे नाकारले आहे.
याप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. जवानांमधील आपसात गोळीबाराचे हे प्रकरण असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आम्ही सर्व पैलूंची चौकशी करू, गोळीबाराच्या घटनेत हरवलेल्या रायफलचा वापर केला जाण्याची शक्यता पोलिस आणि लष्कराला आहे. गोळीबारानंतर लष्कर छावणी सील करण्यता आली असून लोकांच्या हालचालींवर बंदी घालण्यात आली आहे.
भटिंडा छावणी ही आशिया खंडातील सर्वात मोठी लष्करी छावणी आहे. या मिलिटरी छावणीची हद्द सुमारे ४५ किलोमीटर आहे. येथील दारूगोळा डेपो हा देशातील सर्वात मोठ्या डेपोपैकी एक असल्याचे सांगितले जाते.